घरमुंबईजेव्हा तुमची मुलं RJ बनतात

जेव्हा तुमची मुलं RJ बनतात

Subscribe

रेडिओच्या क्षेत्रात करिअर करण्याचं त्याचं वेड शाळेत असल्यापासूनचं. इयत्ता आठवीत असताना, त्यानं अनधिकृतपणे स्वतःचं रेडिओ स्टेशन काढलं होतं.रुईया महाविद्यालयात असताना, रुईयालाही स्वतःचा रेडिओ सुरू करून दिला.आता त्यांने लहान मुलांकडून लहान मुलांसाठी रेडिओ या संकल्पनेवर 'वुई किड्स' नावाचे रेडिओ केंद्र सुरू केले आहे.

लहानपणापासूनच त्याला रेडिओ ऐकायची आवड. तेव्हापासून त्याच आकाशवाणी केंद्रात फोन करून आवडतं गाण वाजवायला सांगणं. कार्यक्रमात सहभाग घेणं, असं सुरू असायचं आकाशवाणीवर तिसरीत असतानाच एक कार्यक्रम केला. शाळेतल्या शिक्षिकेने त्याच्याकडून तो कार्यक्रम करून घेतला. रेडिओच्या क्षेत्रात करिअर करण्याचं त्याचं वेड शाळेत असल्यापासूनचं. इयत्ता आठवीत असताना, त्यानं अनधिकृतपणे स्वतःचं रेडिओ स्टेशन काढलं होतं. रुईया महाविद्यालयात असताना, रुईयालाही स्वतःचा रेडिओ सुरू करून दिला. डबिंग असो की व्हॉइस ओव्हर कलाकार, गायक असो की संगीतकार – रेकॉर्डिस्ट आवाज क्षेत्रासंबंधी कुठल्याही कामात ‘शंतनू जोशी’ कायम अव्वलच असतो.

आता त्यांने लहान मुलांकडून लहान मुलांसाठी रेडिओ या संकल्पनेवर ‘वुई किड्स’ नावाचे रेडिओ केंद्र सुरू केले. लहान मुलांसाठी सुरू केलेल्या या केंद्रावर आपले स्वागत आहे, असे शब्द कानावर पडले. तर नवल वाटायला नको. मुंबईतील शंतनू जोशी या तरूणाने त्याच्या रेडिओवरच्या प्रेमापोटी लहानपणा पासून वेगवेगळ्या संकल्पना केल्या. आता शंतनूने चक्क चिमुकल्यामुलांसाठी त्याच्या हक्काचे व्यासपीठ मिळवून दिलं. या रेडिओमुळे बालकिशोरवयीन मुलांना स्वत:चा आवाज आणि हक्काचे व्यासपीठ मिळालं. प्रत्येक शाळेत रेडिओ किंवा आवाज या विषयाचा किमान एक तास असावा, असं शंतनूला वाटतं. त्यातूनच या नव्या ‘वुई किड्स’ या संकल्पनेची सुरूवात झाली.

- Advertisement -

मुंबईतील शाळामध्ये ‘वुई किड्स’ रेडिओ केंद्र सुरू

unnamed (1)

सध्या मुंबईतील बॉम्बे स्कॉटिश्, ओबेरॉय इंटरनॅशनल, रुस्तमजी केम्ब्रिज इंटरनॅशनल, जीबीसीएन इंटरनॅशनल, शिशुवन या नामांकित शाळांमध्ये रेडिओच्या तासिका आणि वुई किड्स रेडिओ केंद्र सध्या सुरू आहे. या शाळांतील अगदी बालवाडीपासून ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी या वुई किड्समध्ये सहभागी होतात. त्यातील निवडक विद्यार्थ्यांचे कार्यक्रम wekidsnetwork.com या रेडिओ पोर्टलवरून प्रसारित होतात.

- Advertisement -

देशभरात ऐकला जातो वुई किड्स

सुरूवातीला मुंबईपुरता मर्यादित असलेला हा नवीन प्रयोग आता देशपातळीवर गेला आहे. शंतनू जोशीच्या या नव्या प्रयोगालाही स्टार्ट अप इंडिया या केंद्र शासनाच्या योजनेतही मान्यता देण्यात आली आहे. तर आता जास्तीत जास्त शालेय विद्यार्थ्याचे आवाज हे वुई किड्स वर ऐकायला मिळतील, असे शंतनू सांगतो. या वुई किड्सच्या माध्यमातून जवळ जवळ ८ ते ९ हजार मुलांना प्रशिक्षण दिले आहे.

‘वुई किड्स’ वरील कार्यक्रम

बातम्या,नाटक परीक्षण, चित्रपट परीक्षण, पुस्तक परीक्षण, नभोनाट्य, सायन्स विषयक प्रोग्राम, सोशल कॉम्पेन, विशेष पाहुण्यांच्या मुलाखती त्याच बरोबर मित्र-मैत्रिणीच्या मुलाखती, गप्पा, कुटुंबियांच्या मुलाखती, अशा प्रकारचे विविध कार्यक्रम ‘वुई किड्स’ रेडिओवर होतात. लवकरच ‘वुई किड्स’ दुबईमधील शाळांमध्ये देखील सुरू होणार आहे. शंतनू याचे श्रेय त्याच्यासोबत काम करणाऱ्या हिमांशु साळुखे, मृणाली ठाकूर, ख्रिस्टिना डायस, डॉ. नम्रता जोशी, माया बनकर या त्याच्या टीम मधील सहकाऱ्यांना देतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -