घरमुंबईशहराला २४ तास पाणी उपलब्ध करून देणारे गेले कुठे ?

शहराला २४ तास पाणी उपलब्ध करून देणारे गेले कुठे ?

Subscribe

गेल्या अनेक दिवसांपासून महापे ते दिघा भागाला पाण्याचा प्रश्न सतावत असतानाच ऐन दिवाळीत एमआयडीसीने पाण्याचा शटडाऊन सुरू केला. त्यामुळे एमआयडीसी भागात कमी दाबाने पाणी येऊ लागले आहे. पालिकेचे स्वत:चे धरण असताना देखील घणसोली, ऐरोली, दिघा तसेच एमआयडीसीतील झोपडपट्टी भागात बारवी धरणाचे पाणी येते. त्यामुळे जे पाणी पनवेलला दिले जात आहे ते बंद करून नवी मुंबईकरांना देण्यात यावे, अशी मागणी नगरसेवकांनी केली. तर २४ तास पाणी उपलब्ध करून देणार होते त्याचे काय झाले, असा प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहे.

नवी मुंबई महापालिकेला स्वत:चे धरण असूनही अद्याप एमआयडीसी भागात मोरबे धरणाचे पाणी देता आलेले नाही. त्यामुळे एमआयडीसीच्या बारवी धरणाचे पाणी या ठिकाणी पुरवले जाते. पालिका हे पाणी एमआयडीसीकडून विकत घेते. सध्या एमआयडीसीचा गुरुवार रात्रीपासून शटडाऊन सुरू आहे. त्यामुळे शुक्रवार, शनिवार आणि रविवार पाणी येत नाही. गेले १५ दिवस एमआयडीसी भागात पाणीकपात झालेली असल्याने याचा त्रास गावठाण तसेच झोपडपट्टी भागातील नागरिकांना होत आहे. दिवाळीला सुरुवात झाली असताना पाण्याचा प्रश्न गंभीर असून नियोजनच नसल्याने ही वेळ आली असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

अनेक दिवसांपासून पावणे गावात कमी दाबाने पाणी येत आहे. त्यामुळे पाणीटंचाई जाणवत आहे. नेहमी शहरी भागाला न्याय दिला जातो, मात्र झोपडपट्टी आणि गावठाण भागाकडे दुर्लक्ष केले जात आहे. यावर ठोस उपाययोजनांची गरज आहे. २४ तास पाणी उपलब्ध करून देणार होते त्याचे काय झाले? असा थेट प्रश्न नगरसेविका मनीषा भोईर यांनी उपस्थित केला आहे. त्याचवेळी यंदा पाण्याची भीषण टंचाई आहे. शहरी भागात नियमित पाणी येत आहे. अद्याप महापे ते दिघा पाईपलाईनचे काम सहा महिने झाले तरी सुरू झालेले नाही. पाण्याचे नियोजन चुकले आहे. लोकांचे हाल थांबवावेत. जे पाणी पनवेलला दिले जात आहे ते बंद करून नवी मुंबईकरांना पाणी द्या असे सांगत राष्ट्रवादीचे नगरसेवक देविदास हांडे-पाटील म्हणाले.

एमआयडीसी क्षेत्रात पाइपलाईनचे काम सुरू आहे. यापुढे पाण्याचे नियोजन करण्यात येईल. दिघा विभागात पाणी प्रश्क सोडवण्यासाठी टाक्या बांधण्याचा प्रस्ताव महासभेत आणण्यात येईल. तसेच महापे ते दिघा पाइपलाईनचे काम आठ दिवसांत सुरू करण्यात येईल.
सुरेंद्र पाटील-मुख्य शहर अभियंता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -