घरCORONA UPDATEWHO ने केलं धारावी मॉडेलचं कौतुक, यामुळे कोरोना व्हायरस येऊ शकतो नियंत्रणात!

WHO ने केलं धारावी मॉडेलचं कौतुक, यामुळे कोरोना व्हायरस येऊ शकतो नियंत्रणात!

Subscribe

मुंबई महानगरपालिकेने मानले WHO चे आभार

दिवसेंदिवस कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत आहे. अशा परिस्थितीत सरकारकडून कोरोनाशी सामना करण्याचे सर्वतोपरी प्रयत्नही सुरू आहेत. मात्र यात दिलासादायक बाब म्हणजे धारावीत नियंत्रणात आलेली कोरोनाबाधितांची संख्या. मुंबईतील धारावी मॉडेलची जागतिक आरोग्य संघटनेनंही दखल घेतली आहे. त्यांनी धारावी मॉडेलची स्तुती केली आहे.

- Advertisement -

धारावीतील झोपडपट्टी आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी मानली जाते. या भागात जवळपास ६.५ लाख लोकं राहतात. मात्र धारावीत राबवलेल्या मॉडेलची जागतिक आरोग्य संघटनेनं दखल घेतली आहे. WHO चे प्रमुख टेड्रोस एडहानोम गेब्रेयेसुस यांनी मुंबईतील या ‘धारावी मॉडेल’ची स्तुती केली आहे. “केवळ राष्ट्रीय एकात्मता आणि जागतिक ऐक्यातून या साथीला प्रतिबंध केला जाऊ शकतो. जगात अशी अनेक उदाहरणे आहेत की महामारी अत्यंत गंभीर अवस्थेत असली तरीही ती पुन्हा नियंत्रित केली जाऊ शकते. इटली, स्पेन, दक्षिण कोरिया आणि धारावी (मुंबई) जो जास्त लोकसंख्या असलेला भाग आहे ही याची काही उदाहरणं आहेत. मुंबईतील धारावी परिसरात कोरोना चाचणी, रूग्णांचा शोध, सोशल डिस्टन्सिंग आणि संसर्ग रूग्णांवर त्वरीत उपचार केल्यामुळे कोरोनाविरोधातील लढाईत यश मिळताना दिसत आहे. काही देशांमध्ये आता निर्बंध कमी करण्यात येत आहेत. अशा ठिकाणी पुन्हा रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. आम्हाला नेतृत्व, समाजाचा सहभाग आणि सामूहिक एकता आवश्यक आहे,” असं गेब्रेयेसुस यांनी स्पष्ट केलं.

- Advertisement -

या आधी व्यक्त केलेली चिंता

धारावीसारख्या परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू शकतो अशी चिंता सर्वच स्तरातून व्यक्त करण्य़ात आली होती. काही जणांकडून सुरूवातीची संख्या पाहता धारावीचा वुहान असाही उल्लेख केला होता. पण त्यानंतर धारावीत राबवलेल्या पॅटर्नमुळे धारावीसारख्या परिसरातील रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यात प्रशासनाला यश आलं.


हे ही वाचा – ..तर भाजपचा आकडा ४०-५० असता – शरद पवार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -