घरमुंबईविरोधीपक्ष नेता नसणार म्हणणारे विरोधीपक्ष नेते झाले - बाळासाहेब थोरात

विरोधीपक्ष नेता नसणार म्हणणारे विरोधीपक्ष नेते झाले – बाळासाहेब थोरात

Subscribe

देवेंद्र फडणवीस जसे बोलतात ते होत नाही, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांना आता जास्त पूजा करण्याची गरज असल्याची टीका देखील त्यांनी केली.

“विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात विरोधी पक्षनेता देखील नसेल,” असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकी आधी केले होते. यावर आज महाविकास आघाडीचे मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी जोरदार टीका केली आहे. “विरोधीपक्ष नेता नसणार म्हणणारे विरोधीपक्ष नेते झाले,” अशी खोचक प्रतिक्रिया थोरात यांनी दिली. आज मंत्रालयात बाळासाहेब थोरात यांनी आपल्या कॅबिनचा ताबा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

आज खातेवाटपावर चर्चेची शक्यता

शपथविधी होऊन आज १२ दिवस उलटून गेले. मात्र तरी देखील अजून खाते वाटप झाले नाही. याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी खातेवाटपाची आज चर्चा होणे अपेक्षित असल्याचे सांगितले. दरम्यान यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस जसे बोलतात ते होत नाही, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांना आता जास्त पूजा करण्याची गरज असल्याची टीका देखील त्यांनी केली.

- Advertisement -

…म्हणून खातेवाटपाला वेळ लागतोय

दरम्यान बाळासाहेब थोरात यांना खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्ताराबाबत विचारले असता ते म्हणाले की, “त्यांनी पाच वर्षे सरकार चालवायचे आहे. त्यामुळे वेळ लागत असल्याचे सांगत मंत्रिमंडळ, आणि खाते वाटपाची चर्चा आज होणे अपेक्षित असल्याचे सांगितले. तसेच अधिवेशन असणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

तो राष्ट्रवादीचा निर्णय

तसेच मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मला हे कॅबिन मिळाले आहे. आणि आता खाते वाटप झाल्यानंतर त्या खात्याचे काम करता येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकांबद्दल त्यांना विचारले असता, त्यांनी आढावा बैठकीत मुख्यमंत्री सगळ्यांना सोबत घेऊन जे सगळ्यांशी निगडित प्रश्न आहेत. त्यावर चर्चा होत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बाळासाहेब थोरात यांना अजित पवार हे उपमुख्यमंत्री होणार का? याबाबत विचारले असता तो राष्ट्रवादी पक्षाचा निर्णय असल्याचे सांगत अधिक बोलणे टाळले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -