घरमुंबईज्याचे कर्तृत्व त्यालाच मत द्या

ज्याचे कर्तृत्व त्यालाच मत द्या

Subscribe

गायक-त्यागराज खाडिलकर…

घटनेने मतदान करण्याचा हक्क प्रत्येकाला दिलेला आहे. तो प्रत्येकाने बजावलाच पाहिजे. मतदानाचे महत्त्व नागरिकांबरोबर सत्ताधार्‍यांनाही पटलेले आहे. त्यामुळे साध्या सोसायटीतील निवडणूकसुद्धा मतदानानेच होते. वर्षभर अनेक निवडणुका होतात, त्यात तुम्ही मतदान करत असता. पण ही लोकसभेची निवडणूक सर्वांपेक्षा महत्त्वाची आहे. तुम्ही निवडून दिलेला उमेदवार हा थेट केंद्र सरकारमध्ये बसणार आहे.

- Advertisement -

त्यामुळे या मतदानासाठी जातीचा, वारसाचा, धर्माचा, उमेदवार सेलिब्रिटी असण्याचा, विभागाचा विचार न करता जो उमेदवार आपल्याला म्हणण्यापेक्षा देशाला पुढे कसा नेणार आहे त्यावरुन त्या उमेदवाराचा विचार व्हायला हवा. उमेदवारांच्या यादीत स्तोम माजवणारे, प्रसिद्धीचा फायदा घेणारे अनेक असतात, पण त्याचे कर्तृत्त्व आहे का, तो त्याच्या कार्यप्रणालीत संपूर्ण देशाचा विचार करतो का हे तपासूनच मतदान करायला हवे. राजकारण करायचे असेल तर जी कामे होऊ शकतील त्या कामांकडे दुर्लक्ष करणे आता वाढलेले आहे.

मत पाहिजे असेल तर मतदारांचे प्रश्न प्रलंबित ठेवणे हे आजच्या राज्यकर्त्यांच्या कामाचे स्वरुप झालेले आहे. समस्या काय आहेत हे मी सांगण्यापेक्षा राज्यकर्त्यांना त्या माहित आहेत. त्याकडे डोळेझाक करणे प्रथम थांबले पाहिजे. राम मंदिर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, कर्जमाफी हे प्रश्न लांबणीवर का पडतात? हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -