घरमुंबईमाझ्याकडे नोकरी का करत नाहीस?

माझ्याकडे नोकरी का करत नाहीस?

Subscribe

संघर्ष समितीच्या चालकास अटक

दिवा संघर्ष समितीच्या नावाने संस्था चालवत असलेले राजकांत परशुराम पाटील आणि त्यांच्या पत्नी यांनी एका विद्यार्थ्यांस संस्थेच्या कामाकाज करण्याकरिता जबरदस्ती करीत असल्याचा धक्कादायक प्रकार दिव्यात घडला आहे. या विद्यार्थ्यांने त्याला नकार दिला म्हणून पाटील यांनी त्या विद्यार्थ्यांस बेदम मारहाण केली. सुमित मोरे असे मारहाण झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो 12 वीत शिकत असून लवकरच त्याची परिक्षा सुरु होणार आहे. मात्र तो गंभीर जखमी झाला असून कळवा रुग्णालयात उपचार घेत आहे. दिवा पूर्व बी.आर.नगर येथील पाटील यांच्याच परिसरात मोरे कुटुंबिय रहात असून छोटे दुकान चालवून त्यांचा उदरनिर्वाह होत आहे.

एक फेब्रुवारी रोजी सकाळीच्या वेळेत दिवा संघर्ष समितीचे अध्यक्ष पाटील यांनी सुमितला घरी बोलावून ‘तू संस्थेच्या कामकाज करण्यासाठी आमच्या ऑफिसमध्ये काम कर’ असे सांगितले. यावर सुमितने सध्या माझी परिक्षा सुरू होत असून 12 वीची परीक्षा झाल्यावर कळवतो, असे उत्तर दिले. त्यामुळे रागावलेल्या पाटील यांनी त्याला मारहाण आणि शिविगाळ केल्याची तक्रार सुमित आणि त्याच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे केली आहे. काही समाजसेवकांच्या उपस्थितीत ही तक्रार रविवारी उशिरा दाखल झाली. त्यानुसार रविवारी 3 डिसेंबर रोजी राजकांत पाटील यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

सुमित उत्तम मोरे या 12 मध्ये शिकणार्‍या विद्यार्थास मारहाण केल्या प्रकरणी राजकांत पाटील यांच्यावर सुमित यांच्या तक्रारीवरून 394, 504, 506(2), 427, 452 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंब्रा पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. पुढील तपास सुरु आहे.
-किशोर पासलकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक

माझी 12 वीची परिक्षा सुरू होणार असल्यामुळे मी त्यांना नंतर कळवतो असे सांगितले. मात्र त्यांना या गोष्टीचा राग आला आणि मला नकार देणारा तू कोण असे म्हणत त्यांनी मला मारहाण केली आणि यापुढे तू दुकान कसे चालवतो. अशी धमकी दिली. त्यामुळे आता माझ्या कुटुंबावर फार मोठे संकट कोसळले आहे. त्यातच आता माझी परिक्षा असल्याने मी काय करू काही कळत नाही.
सुमित मोरे, पिडीत विद्यार्थी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -