सचिन, दिलीप कुमार यांच्यावर का भडकले होते बाळासाहेब ठाकरे ?

bal thackray sachin dilip kumar

बाळासाहेब ठाकरे यांना तापट स्वभावासाठी ओळखल जायच. बाळासाहेब कधी कोणाला काय बोलतील याचा नेम नव्हता. मग समोर कितीही मोठी व्यक्ती असो. बाळासाहेब ठाकरे आपल्या ठाकरी शैलीत समाचार घेतल्याशिवाय रहायचे नाहीत. क्रिकेटचा देव म्हणून ओळख असणाऱ्या सचिन तेंडुलकरलाही त्यामध्ये माफी नव्हती.

मुंबईतला स्थानिक विरूद्ध परप्रांतीय हा मुद्दा शिगेला पोहचलेला असताना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने या विषयावर टिप्पणी केली होती. महाराष्ट्रातल्या मुंबईवर सर्वांचा अधिकार आहे अशा शब्दात सचिन तेंडुलकरने आपले मत मांडले होते. पण या विधानामुळे बाळासाहेब ठाकरे अतिशय चिडले. त्यांनी सचिन तेंडुलकरच्या या विधानानंतर अतिशय रोखठोक मत मांडत बाळासाहेब ठाकरे यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

काय म्हणाले होते बाळासाहेब ठाकरे

तु क्रिकेटच्या पिचवरच थांब आणि राजकारणाचा खेळ आम्हाला खेळू दे.

बाळासाहेब ठाकेर आणि बॉलिवुड हे एक वेगळच नात होते. अनेक बॉलिवुड सेलिब्रिटींसोबत त्यांची चांगलीच गट्टी होती. बॉलिवुडमध्ये संजय दत्त याला मदत करण्यापासून ते दिलीप कुमार यांच्याशी असलेल्या मैत्रीसाठीही ते नेहमीच ओळखले जायचे. दिलीप कुमार आणि बाळासाहेब ठाकरे यांची रोजची गप्पांची मैफिल रंगायची. पण दिलीप कुमार यांनी पाकिस्तानातील सर्वोच्च सन्मान असलेला निशान ए इम्तियाज स्विकारला तेव्हा दोघांच्या मैत्रीत फुट पडत गेली.

बाळ ठाकरे यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबतची मैत्रीही नेहमीच चर्चेत राहिली. अमिताभ बच्चन अनेक प्रसंगी बाळ ठाकरे यांचे आशीर्वाद घ्यायला जायचे. राज कपूर यांचेही मातोश्रीवर येणे जाणे असायचे.

बाळासाहेब आणि व्यंगचित्र
१९५० च्या दशकात क्रांतीकारी आणि प्रसिद्ध व्यंगचित्रकारांमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचाही उल्लेख आवर्जून व्हायचा. अगदी बॉलिवुडमधील चित्रपटांपासून ते राजकारणावर नेमक्या शब्दात तिखट टिप्पणी हे त्यांच्या व्यंगचित्राच वैशिष्ट्य होते.