घरट्रेंडिंगआताच मुंबई लोकल बंद निर्णय का? वाचा मुंबईच्या पालकमंत्र्यांचे उत्तर

आताच मुंबई लोकल बंद निर्णय का? वाचा मुंबईच्या पालकमंत्र्यांचे उत्तर

Subscribe

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे हे आपल्याला करोनाच्या स्टेज ३ मध्ये जायचे नाही, हे वारंवार सांगत होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील २२ मार्च रोजी देशभरात जनता कर्फ्यू पाळला जाईल, अशी घोषणा केली. आता पुढची कडी म्हणजे ज्या लोकल सेवेमुळे करोनाचा स्फोट होऊ शकतो, असे बोलले जात होते. त्या लोकल सेवेला २२ मार्चच्या मध्यरात्रीपासून पुर्णपणे बंद केली जाणार आहे. करोनामुळे परिस्थिती हातातून निसटू नये, म्हणून मुंबई लोकल रेल्वेची सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्टीकरण मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिले आहे.

अस्लम शेख म्हणाले की, “राज्य सरकारच्यावतीने लोकांना अनावश्यक प्रवास न करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र आठवभरात रेल्वेतील गर्दी काही कमी झाली नाही. जर आपण ३ ऱ्या स्टेजमध्ये गेलो तर ते आपल्याला परवडण्यासारखे नाही. त्यामुळेच सक्तीने लोकल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.”

- Advertisement -

चीनमध्ये डिसेंबरच्या आसपास करोनाचा विषाणू पसरण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर युरोपमधील इटली, ब्रिटन, जर्मनी या देशांमध्येही करोनाचे रुग्ण आढळून आले. अमेरिकेतही करोनामुळे अनेकांचे मृत्यू झाले आहेत. इटलीमध्ये तर चीनपेक्षाही अधिक मृत्यू झाले आहेत. त्या तुलनेने भारताने ही महामारी पसरू दिलेली नाही. मात्र तरिही आपण वचक नाही ठेवला तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. त्यामुळेच सरकारला आता कठोर निर्णय घ्यावे लागले आहेत, असे अस्लम शेख यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूचा घेतलेला निर्णय अतिशय योग्य होता. देशात ९० टक्के लोकांनी या निर्णयाचे स्वागत करत कर्फ्यू तंतोतंत पाळला आहे. मात्र तरिही काही लोक बाहेर भटकत आहेत. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे. लोकांनी त्यांना सहकार्य केले पाहीजे, असे आवाहनही शेख यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -