राज ठाकरेंना काँग्रेस-राष्ट्रवादीला प्रश्न विचारण्याची लाज वाटते – विनोद तावडे

Mumbai
Raj thackeray is campaigning for which party?- vinod tawade
विनोद तावडे यांचा राज ठाकरेंना सवाल

राज ठाकरे यांनी काल आपल्या भांडूपमधील सभेत रेल्वे अपघातामधील मोनिका मोरे यांना व्यासपिठावर आणले होते, याबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना तावडे यांनी सांगितले की, ज्यावेळी त्यांचा अपघात झाला त्यावेळी त्या शिकत होत्या, त्यावेळी काँग्रेसचे सरकार होते. पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी संजय निरुपम यांचे सोबत केईएम रुग्णालयात मोनिका मोरे यांना भेटायला गेल्या. पण त्यावेळी काँग्रेस सरकारने काहीही केले नाही. पण खासदार किरीट सोमय्या यांनी आर्टीफीशियल ऑरगनच्या माध्यमातून मोनिका मोरे यांना सर्व प्रकारची मदत विविध ट्रस्टमार्फत करुन दिली. मात्र काँग्रेसने त्यावेळी काही केले नाही आणि आता उलट राज ठाकरे हाच प्रश्न किरीट सोमय्यांना विचारत आहेत. पण राज ठाकरे यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला का विचारता येत नाही? जेव्हा आघाडीचे सरकार होत त्यावेळी त्यांना का नाही विचारले? त्यांना विचारायला तुम्हाला लाज वाटते का? असा सवाल तावडे यांनी आज पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उपस्थित केला.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भाषा सेम टु सेम आहे, त्यामुळे राज ठाकरे कोणाच्या स्क्रिप्टनुसार सध्या भाषणे करत आहेत. हे आता वेगळे सांगायची गरज नाही, असे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज स्पष्ट केले. पत्रकारांशी बोलताना तावडे यांनी सांगितले की, शरद पवार आणि राज ठाकरे यांच्या वेगवेगळ्या जाहिर सभा झाल्या. पण या जाहिर सभांमधील भाषा मात्र एकच आहे. मोदी सरकार, भाजपची वाटचाल हुकुमशाहीकडे चालली आहे, हे शरद पवार पण बोलले आणि राज ठाकरे पण नेमके तेच बोलले.

तसेच नरेंद्र मोदी हे शहीदांच्या नावावर मतं मागतात हेच वाक्य शरद पवारही बोलले आणि राज ठाकरे यांनीही आपल्या भाषणात हाच उल्लेख केला. त्यामुळे जनतेलाही आता कळले असेल की, राज ठाकरे कोणाच्या स्क्रीप्टनुसार कसे काम करीत आहेत, असेही तावडे यांनी स्पष्ट केले.

अभिनंदनची सुटका जिनिव्हा करारामुळे झाल्याचे शरद पवार म्हणत असतील तर मग कुलभूषण जाधव यांची सुटका जिनिव्हा करारामुळे का नाही झाली? त्यामुळे जर कुलभुषण जाधव यांची सुटका होत नसेल तर अभिनंदन यांची पण झाली नसती. अभिनंदन यांची सुटका होण्यासाठी भारताने विशेष प्रयत्न केले, तसेच विशेष आंतरराष्ट्रीय दबाव हा मोदी सरकारने आणल्यामुळे अभिनंदन यांची सुटका झाली. हे पवार का मान्य करत नाही. कुलभूषण यांच्या सुटकेसाठी केंद्र सरकार प्रयत्न नक्की प्रयत्न करत आहे,पण कुलभूषण ला पाकिस्तान फाशी देणार होता ते थांबवून आंतराष्ट्रीय कोर्टात आपण ती बाजू भक्कमपणे लढत आहोत हे मोदी सरकारचे मोठ यश आहे हे शरद पवार यांना दिसत नाही का असा सवालही तावडे यांनी यावेळी केला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here