घरमुंबईपत्नीची पतीला अमानुष मारहाण

पत्नीची पतीला अमानुष मारहाण

Subscribe

हात पाय बांधून ओतले गरम तेल,डोळ्यात टाकली मिरची पूड

पत्नीने आपल्या मित्राच्या मदतीने पतीवर जीवघेणा हल्ला करीत अमानुष मारहाण केली. अर्धनग्न अवस्थेत खुर्चीला बांधून त्याच्यावर उकळते तेल ओतले. डोळ्यात मिरचीची पूड टाकली. इतकेच नाही तर हातोड्याने अमानुष मारहाणही केली. आपल्या दोन लहान मुलांच्या समोरच ही मारहाण करण्यात आली. शेजार्‍यांच्या सतर्कतेमुळे पतीला वाचवण्यात आले असले तरी सध्या त्याची प्रकृत्ती चिंताजनक आहे.

ही घटना मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास उमेळमान येथील प्रतापगड इमारतीमधील एका फ्लॅटमध्ये घडली. भविष्य भूहागोगाय असे पतीने नाव आहे. तर क्यूंशिया असे पत्नीचे नाव असून सतवीर नायक तिचा मित्र आहे. काल रात्री साडेआठच्या सुमारास क्यूंशियाने सतवीरच्या मदतीने पती भविष्यला रस्सीने एका खुर्चीला बांधले. त्यानंतर त्याच्या अंगावर उकळते तेल ओतले. डोळ्यात मिरचीची पूड टाकली. त्यानंतर हातोडीने त्याला अमानुष मारहाण केली. जखमी भविष्य मदतीसाठी याचना करीत होता. संधी मिळताच त्याने कुकर आपल्या फ्लॅटच्या खिडकीवर मारला. त्यामुळे खिडकीची काच फुटून कुकर रस्त्यावर आला. त्यावेळी परिसरातील लोकांना त्या घरात हाणामारी सुरू असल्याचे कळले.

- Advertisement -

जागरुक नागरीकांनी माणिकपूर पोलिसांना घटनास्थळी पाचारण केले. त्यावेळी घरातील दृश्य पाहून सारेच अवाक झाले होते. भविष्य रक्ताने माखलेला, उकळत्या तेलामुळे भाजलेल्या अवस्थेत जबर जखमी होऊन व्हिवळत होता. दोन लहान मुले घाबरून एका कोपर्‍यात बसली होती. घरात सगळीकडे भांडी आणि सामान विस्कटलेले होते. पोलिसांनी तातडीने जखमी भविष्यला हॉस्पीटलमध्ये दाखल केले.

सतवीर आपल्या पत्नीचा प्रियकर असून त्या दोघांनी मिळून मला ठार मारण्याचा प्रयत्न केला, असा आरोप भविष्यने केेला आहे. तर पती सतत भांडण करीत असतो. मारहाण करीत असतो. त्यामुळे आपण त्रासले होतो, असे क्यूंशियाने पोलिसांना सांगितले आहे. मात्र, या अमानुष मारहाणीमागचे खरे कारण अद्याप उघडकीस आलेले नाही. भविष्यची प्रकृत्ती खालावल्याने त्याला उपचारासाठी मुंबईतील जे. जे. हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -