घरट्रेंडिंगपत्नीला 'जाडी' म्हणताय ? मग वाचाच!

पत्नीला ‘जाडी’ म्हणताय ? मग वाचाच!

Subscribe

बीकेसीमध्ये राहणाऱ्या एका तरुणीचा विवाह आई वडिलांच्या पसंतीच्या मुलाशी झाला. लग्नाच्या पहिल्याच दिवसापासून तो तिला 'जाडी' म्हणून चिडवू लागला.

एखाद्याच्या शरीरयष्टीवरुन तुम्ही कोणाला टोमणे मारत असाल तर मग थोड थांबा. त्यातल्या त्यात जर तुम्ही तुमच्या बायकोला चिडवत असाल तर ही बातमी नीट वाचा… कारण असे चिडवणे किती महागात पडू शकते याचा अनुभव मुंबईतील एका तरुणाला आला आहे. या तरुणाचा स्थुल महिलेशी विवाह झाला. पण तो सतत तिला ‘जाडी’ म्हणत हिणवायचा. अखेर कंटाळलेल्या पत्नीने पोलिसात धाव घेत आपल्या पतीविरोधातच गुन्हा दाखल केला.

का आला पत्नीला राग ?

बीकेसीमध्ये राहणाऱ्या एका तरुणीचा विवाह आई वडिलांच्या पसंतीच्या मुलाशी झाला. लग्नाच्या पहिल्याच दिवसापासून तो तिला ‘जाडी’ म्हणून चिडवू लागला. तिला उठल्या बसल्या तिच्या जाडेपणावरुन तो हिणवायचा. मुलीच्या घरच्यांनी लग्नाचा सगळा खर्च केला. शिवाय मुलीला १८ लाख रुपयांचे दागिने देखील दिले. इतके सगळे करुन देखील नवरा या तरुणीला तिच्या जाडेपणावरुन चिडवायचा, असा आरोप पत्नीने केला आहे.

- Advertisement -

नवऱ्याला हवी होती कार

तरुणीला जाडेपणावरुन चिडवल्यामुळे या दोघांमध्ये सतत खटके उडायचे. तो तिला सतत ‘तुझ्यासारख्या जाड मुलीशी कोणीही लग्न केले नसते पण मी केले’. जर तुला संसार टिकवायचा असेल तर तुझ्या माहेराहून १० लाख रुपये आणि कार मला आणून दे’, अशी मागणी करु लागला.  शेवटी कंटाळलेल्या तरुणीने तिच्या घरी सगळा प्रकार सांगितला. तो सतत जाडेपणावरुन अपमान करतो हे देखील सांगितले आणि तिने पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी तिची तक्रार नोंदवली असून पोलीस सध्या या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -