घरमुंबईशहापूरच्या जंगलातील वन्यप्राण्यांवर संक्रांत!

शहापूरच्या जंगलातील वन्यप्राण्यांवर संक्रांत!

Subscribe

शिकारी टोळ्यांचा उच्छाद वाढला

प्रादेशिक विभागाच्या घनदाट जंगलात मुक्तपणे संचार करणार्‍या वन्य प्राणी, दुर्मिळ पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. शिकार्‍यांकडून पक्ष्यांना लक्ष्य केले जात आहे. जंगलात होणारे अतिक्रमण, वाहनांचा आवाज, विविध रस्ते व धरण प्रकल्पांसाठी सुरू असलेली जंगलतोड, उन्हाळ्यात शिकारीसाठी पेटवलेले वणवे, पाण्याची टंचाई या अनेक समस्यांमुळे शहापूरच्या जंगलातील वन्यप्राणी पक्षी स्थलांतर करत आहेत.

शहापूर तालुक्यातील प्रादेशिक व वन्यजीव विभागाच्या जंगलात वन्यप्राणी व पक्ष्यांंचे अस्तित्व आहे. यात दाट जंगलात बिबट्या, तरस, भेकर , ससे,रानडुक्कर, माकड, वानरे, रानमांजर, मुंगस या प्राण्यांचे व दुर्मिळ अशी टिटवी, कोतवाल, हळदया, चातक, घुबड, पिंगळ्या, खारीक, सुतार, खंड्या, धोबी, मोर, गरुड, घार पोपट, भुगंराज यांसह अनेक पक्ष्यांचा संचार आहे. मात्र वन्यप्राणी व पक्ष्यांची संख्या दरवर्षी कमालीची रोडावत चालल्याने वन्यप्रेमींमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
स्थानिक आदिवासींकडून खाण्यासाठी तसेच इतर कारणांसाठी प्राणी पक्ष्यांची शिकार होत आहे. त्यासाठी सापळे लावले जात आहेत शिवाय शिकारीसाठी वणवे पेटवले जात असल्याने वृक्षांचीही हानी होत आहे.

- Advertisement -

जाळ्यांचा व टोकदार भाले, लाठ्याकाठ्यांचा वापर करून जंगलात रात्रीच्या वेळेस छुप्या पद्धतीने वन्यप्राण्यांची शिकार केली जात आहे. हा प्रकार गेली अनेक वर्षे तानसा अभयारण्य व प्रादेशिक विभागाच्या जंगलात सुरू आहे. या शिवाय शहापूर तालुक्यात विविध रस्ते, धरणे प्रकल्पांच्या विकास कामांच्या नावखाली मोठ्या प्रमाणावर जंगल डोंगर माथे भुईसपाट होत असल्याने जंगल नष्ट होत आहे.

शिकार्‍यांची टोळी वन कर्मचार्‍यांच्या जाळ्यात
शहापूर तालुक्यातील खर्डी प्रादेशिक वनपरिक्षेत्रातील जंगलात जाळे लावून शिकारीच्या तयारीत असलेल्या शिकार्‍यांची एक टोळी वन कर्मचार्‍यांच्या जाळ्यात नुकतीच अडकली आहे. या टोळीतील 8 शिकार्‍यांवर वन्यजीव कायद्याअंतर्गत खर्डी वन अधिकार्‍यांनी गुन्हा दाखल करीत त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. शहापूर तालुक्यातील खर्डी वनपरिक्षेत्राच्या हद्दीत जरंडीच्या जंगलात वन अधिकारी प्रशांत देशमुख हे पथकासह गस्त घालीत होते. त्यावेळी या पथकाला जंगलातील एका भागात शिकारीसाठी लावण्यात आलेल्या वाघूर (जाळे) लावल्याचे निदर्शनास आले. यावेळी काही शिकारी जाळे लावून शिकार करण्याच्या तयारीत असल्याचे दिसतास वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांना तब्येत घेतले आहे. या आरोपींकडून 8 वाघूर (ससे व काळवीट पकडण्याचा जाळे ) जप्त करण्यात आल्याची माहिती वन अधिकार्‍यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -