घरCORONA UPDATECoronavirus : लॉकडाऊनमुळे वन्यप्राणी त्रस्त; त्यांना अन्नपदार्थ खायला देऊ नका!

Coronavirus : लॉकडाऊनमुळे वन्यप्राणी त्रस्त; त्यांना अन्नपदार्थ खायला देऊ नका!

Subscribe

छत्तीसगड राज्यातील महासमुंद जिल्ह्यामधील घूनचपली घुंचापाली डोंगरावर स्थित श्री चंडी माता मंदिरमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून जंगलातले अस्वल मंदिर परिसरामध्ये खाण्यासाठी येतात.

जगभरात कोरोना व्हायरसचा प्रसार जलद होत आहे. तसेच दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत आहे. लॉकडाऊनमध्ये फक्त पाळीव प्राण्यांसह वन्यप्राणी देखील हैराण झाल्याचे दिसून येत आहे. छत्तीसगड राज्यातील महासमुंद जिल्ह्यामधील घूनचपली घुंचापाली डोंगरावर स्थित श्री चंडी माता मंदिरमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून जंगलातले अस्वल मंदिर परिसरामध्ये खाण्यासाठी येतात. श्रद्धालू भक्त आपल्या हाताने या अस्वलांना फळ देतात. परंतु, लॉकडाऊनमुळे सर्व मंदिरे बंद झाली आहेत. त्यामुळे या अस्वलांना ही खाण्यासाठी फळ आणि अन्न मिळणे कठीण झाले आहे. इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसचे अधिकारी प्रवीण कासवान यांनी मंदिरातील अस्वलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात अस्वल मंदिर परिसरात खाणे शोधत आहे.

- Advertisement -

प्रवीण कासवान यांनी शेअर करताना नमूद केले की, लॉकडाऊनमुळे मंदिर बंद झाले आहेत. त्यामुळे अस्वलांना अन्न मिळत नाही. ते दररोज येतात आणि काही न खाता निघून जातात. इथे दोन अस्वल आले आणि त्यांना काहीही खाण्यासाठी मिळाले नाही. तेव्हा त्यांनी रागाने कचऱ्याचे डब्बे फेकण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोघेही मंदिरामध्ये खेळताना दिसून आले. यावरून सूचना दिली जाते की, ‘वन्यप्राण्यांना खाणे घालू नये.’ ट्विटरवर या व्हिडीओला आतापर्यंत १२ हजारातून अधिक व्ह्यू मिळाले आहेत. तसेच हजाराहून अधिक लाईक्स आणि २०० हुन अधिक रिट्विट आले आहेत. लॉकडाऊनमध्ये मंदिर परिसर बंद करण्यात आला आहे. डोंगरावरचे रस्ते ही धोकादायक आहेत. फक्त मंदिरचे कर्मचारी ही जातात. आता या अस्वलांचे पोट निसर्गावर अवलंबून आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -