घरमुंबईआरेतील झाडांच्या खुन्यांना सत्तेत आल्यानंतर बघू - उद्धव ठाकरे

आरेतील झाडांच्या खुन्यांना सत्तेत आल्यानंतर बघू – उद्धव ठाकरे

Subscribe

“आरेतील झाडांचा विषय मी सोडलेला नाही. सत्तेत आल्यानंतर झाडांचे जे कोणी खुनी असतील त्यांचे काय करायचे ते आम्ही ठरवू,” अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शनिवारी झाडे तोडण्याच्या कृतीवर नाराजी व्यक्त केली. मुंबईतील मेट्रो कारशेडसाठी आरेतील झाडे कापण्याच्या निर्णयाविरोधात पर्यावरणवादी तसेच मुंबईकरांनी अनेक दिवस आंदोलन केले. तरीही जनमताची पर्वा न करता काल रात्री आरेतील झाडे कापण्यात आली. सराकरच्या या कृतीविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. यापार्श्वभूमीवर आज पत्रकारांशी बोलताना ठाकरे यांनी आरेतील वृक्षतोडीला शिवसेनेचा विरोध कायम असल्याचे स्पष्ट केले. आरेबाबत मी स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन बोलणार आहे. तो विषय मी सोडलेला नाही. याबाबत रोखठोक भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

उद्धव ठाकरे म्हणाले की, “आरे सध्या महत्त्वाचा विषय बनला आहे. काल रात्री, आज दिवसभर आणि पुढे आरेमध्ये जे काही घडेल त्याची सर्व माहिती मी घेणार आहे. आरे विषयावर आम्ही ठाम भूमिका घेऊ. विधानसभा निवडणुकीत भाजप-सेना युतीचाच विजय होणार आहे. त्यानंतर आम्ही आरेतील झाडांच्या कत्तलीला जबाबदार असणाऱ्यांकडे पाहू”

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सकाळीच आरेतील झाडांच्या कत्तलीबाबत ट्विटरवर संताप व्यक्त केला होता. आचारसंहिता सुर असतानाच ज्या पद्धतीने रात्रीच्या अंधारात झाडे कापली जात आहेत आणि पर्यावरणप्रेमींना ताब्यात घेण्यात येत आहे, याचा आदित्य ठाकरेंनी निषेध व्यक्त केला होता.

- Advertisement -

हायकोर्टाच्या निकालानंतर एका रात्रीत शेकडो झाडे कापण्यात आली आहेत. त्यानंतर उसळलेल्या आंदोलनात २९ आंदोलनकर्त्यांना अटक करण्यात आलेली आहे, तर १०० हून आंदोलकांना ताब्यात घेऊन सोडून देण्यात आले. अटक केलेल्या आंदोलकांना बोरीवली कोर्टात सादर केल्यानंतर सोमवारपर्यंतची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -