घरमुंबईशिवसेनेबरोबर बरोबर युती करणार नाही

शिवसेनेबरोबर बरोबर युती करणार नाही

Subscribe

आमदार नरेंद्र मेहता यांची माहिती,भाईंदरमध्ये युतीत तणाव वाढला

भाईंदर- मीरा भाईंदर महानगरपालिकेत शिवसेनेने स्थायी समिती सभागृह व महापौर दालनाची तोडफोड केली. तोडफोड केल्यामुळे आमदार नरेंद्र मेहता यांनी शिवसेनेबरोबर युती करणार नाही असे जाहिर केले आहे. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून संघर्ष सुरु असलेल्या युतीतील तणाव आणखीन वाढला आहे.

शिवसेना फक्त भाजप व मोदीजीमुळे निवडून येते. महापालिकेत घटलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. महिला महापौरांच्या केबिनमध्ये जाऊन शिवीगाळी करून शिवसैनिकांनी कार्यालयाची तोडफोड केली आहे. मारामारी करणे , आई बहिणीवरुन शिवीगाळी करणे अत्यंत निंदनीय आहे. तेही महिला महापौरांच्या केबिनमध्ये जाऊन तोडफोड करून शिवीगाळ करणे म्हणजे अत्यंत शरमेची गोष्ट आहे, अशा शब्दात आमदार मेहता यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

- Advertisement -

शिवसेनेने तोडफोड करून जनतेच्या पैशाचे नुकसान केले आहे. यासाठी जनतेचे पैसे वापरले आहेत ते काही तुमच्या घरचे नाहीत हे त्यांना भरावे लागतील. त्यांना याचे उत्तर येणार्‍या महासभेत दिले जाईल, असे आव्हानही मेहता यांनी दिले आहे. एकीकडे महिलेच्या सन्मानाची गोष्ट करतात आणि दुसरीकडे महिलांचा अपमान करतात, असा आरोपही मेहता यांनी केला आहे.

कलादालनाचा ठराव भाजपनेच आणला आहे. परंतु त्यासाठी महापालिकेकडे आर्थिक तरतूद नाही. दोन कोटी रुपये महापालिका व 23 कोटी रुपये महाराष्ट्र शासन देणार आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी गेल्या पाच वर्षात एकही रुपया या कामासाठी आणला नाही. बजेटमध्ये मान्यता नसताना निवडणूकीसाठी उद्घाटन करण्याचा आमदार सरनाईक यांचा अट्टाहास चुकीचा आहे, असेही मेहता यांनी सांगितले. याप्रकरणी मुख्यमंत्री आणि पक्षाच्या वरिष्ठांशी संपर्क साधून आहे. शिवसैनिकांनी केलेला प्रकार निंदनीय असून आमदार सरनाईक आणि नगरसेवकांनी सभागृहात येऊन माफी मागितली पाहिजे. अन्यथा मीरा भाईंदरमध्ये शिवसेनेशी युती करणार नाही, असेही मेहता यांनी सांगितले.

- Advertisement -

सदस्यांव्यतिरिक्त शिवसेनेचे काही नगरसेवक आणि शिवसैनिक बेकायदेशीरपणे स्थायी समितीच्या बैठकीत बसले होते. त्यांना बाहेर जाण्याची विनंती सभापतींनी केली होती. त्यानंतरही त्यांनी सभागृहाबाहेर न जाता गोंधळ घालत शिवीगाळ करीत सभागृह आणि महापौर दालनाची तोडफोड केली. हा महिला महापौरांचा अवमान आहे, असा आरोप महापौर डिंपल मेहता यांनी केला आहे. याप्रकरणी संबंधित नगरसेवक आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यासोबतच नुकसान भरपाई करावी अशी मागणी केल्याचे मेहता यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -