घरमुंबईझोपडपट्ट्यांत वोटर स्लीपसाठी बीएलची मदत घेणार

झोपडपट्ट्यांत वोटर स्लीपसाठी बीएलची मदत घेणार

Subscribe

मतदारांना अ‍ॅडव्हान्स वोटरस्लीप

झोपडपट्ट्यांमध्ये मतदारांचे पत्ते शोधायचे कसे असा प्रश्न निवडणूक आयोगाला लोकसभा निवडणुकांच्या वेळी पडला होता. अनेक ठिकाणी मतदारांना वोटर स्लीप न मिळाल्याची कुरबुरही आयोगाच्या कानी होती. वोटर स्लीप घरोघरी पोहचवण्यासाठी यंदा निवडणूक आयोगाने यंदा राजकीय पक्षांची मदत घेण्याचे ठरविले आहे. सरासरी ७ दिवस आधीच वोटर स्लीप पोहचवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

झोपडीभागात अनेक पत्ते सापडत नाहीत ही निवडणूक आयोगाच्या कर्मचार्‍यांची महत्वाची अडचण होती. अनेकदा पत्ते हे सविस्तर नाहीत, तसेच असलेल्या पत्त्यावर ते मतदार राहत नाहीत असा अभिप्राय निवडणूक आयोगाच्या कर्मचार्‍यांकडून नोंदविण्यात आला होता. त्यामुळेच यंदा झोपडीवासीय असलेल्या भागात प्राधान्याने वोटर स्लीप पोहचवण्याचा राज्य निवडणूक आयोगाचा मानस आहे. ‘आम्ही झोपडीवासीयांच्या भागात यंदा राजकीय पक्षाच्या बुथ लेव्हल एजंटची मदत घेणार आहोत. तशा सूचना बुथ लेव्हल ऑफिसर्सना देण्यात आल्या आहेत असे उप जिल्हाधिकारी तसेच उपजिल्हा निवडणुक अधिकारी फरोग मुकादम यांनी सांगितले. अनेक ठिकाणी मतदारांच्या पत्त्यावर पोहचता येत नाही. अशावेळी बीएलएची मदत घेण्यात येणार आहे. अनेक ठिकाणी मतदारांनाच बीएलएच्या मदतीने बोलावून वोटर स्लीप देण्यात येणार आहेत. तर काही ठिकाणी सार्वजनिक ठिकाणीच या स्लीप देण्यात येतील.

- Advertisement -

वोटर स्लीप नाही मिळाली तर…

अनेकदा वोटर स्लीप देण्यासाठी आलेला निवडणूक विभागाचा कर्मचारी आपल्या दारात पोहचतो खरा, पण घराला कुलूप असल्याने त्या मतदाराची वोटर स्लीप देता येत नाही. कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीकडे इतरांच्या वोटर स्लीप देण्याचा पर्याय आहे. म्हणूनच आता मतदारांना नजीकच्या निवडणूक कार्यालयातून वोटर स्लीप घेण्याचा पर्याय आहे. आपल्याकडे असणारे योग्य ओळखपत्र दाखवून मतदारांना वोटर स्लीप घेता येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -