घरमुंबईविजय माल्ल्याची SUV विकत घेण्याच्या नादात ४५ लाखांचा गंडा

विजय माल्ल्याची SUV विकत घेण्याच्या नादात ४५ लाखांचा गंडा

Subscribe

विजय माल्ल्याच्या ताफ्यातील गाड्या मिळवून देतो असं आमिष देत नवी मुंबईतील एका भामट्यानं ८ जणांना ४५ लाखांचा गंडा घातला आहे.

देशातील बँकांचे ९ हजार कोटी बुडवून परदेशी पळालेल्या विजय माल्ल्याच्या महागड्या गाड्या खरेदी करण्याच्या नादात ८ जणांना तब्बल ४५ लाखांचा गंडा घातला गेला आहे. विजय माल्ल्या प्रकरणामध्ये तपास अधिकारी आहे. असे भासवून ४५ वर्षीय आरोपींनं आठ जणांना तब्बल ४५ लाखांचा चुना लावला आहे. या फरार आरोपीनं विजय माल्ल्याच्या ताफ्यातील जप्त केलेल्या महागड्या एसयूव्ही गाड्या स्वस्तात खरेदी करून देण्याचं आमिष संबंधितांना दिलं. त्याच्या या भूलथापांना बळी पडून ८ जणांनी फरार आरोपीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले. पण, खात्यात पैसे आल्यानंतर आरोपी गायब झाले. आरोपीनं आर.के.सिन्हा आणि राजीव कुमार सिंह अशी बनावट नावं धारण केली. त्यानंतर आपण ईडी आणि कस्टम खात्याचे अधिकारी असल्याचे दाखवले. या खोट्या ओळखीच्या आधारे आरोपीनं खारघरमध्ये सात आणि सीबीडीमध्ये एका व्यक्तीला गंडवलं. आरोपीने विजय मल्ल्याच्या ताफ्यातील जप्त केलेल्या महागडया एसयूव्ही गाडया स्वस्त दरात मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्याच्या या आमिषाला भुलून तक्रारदारांनी त्यांच्या खात्यात ऑनलाइन रक्कम ट्रान्सफर केली. तर, दुसरीकडे माल्ल्याच्या ताफ्यातील जप्त केलेल्या एसयूव्ही कारचा लिलाव हा सप्टेंबरमध्ये होणार आहे. असे सांगत सीबीडी बेलापूरमधील माणसाला ४.४५ लाखांना फसवले. दरम्यान, या आरोपीचा सध्या पोलिस कसून शोध घेत आहेत. मॉर्निंग वॉकच्या बहाण्यानं ओळख वाढवून विश्वास संपादन केल्यानंतर कारचे फोटो दाखवून हा गंडा घातला गेला. पोलिस ज्यावेळी आरोरपीच्या घरी पोहोचले तेव्हा घरच्यांनी मात्र दरवाजा उघडण्यास नकार दिला. आरोपी बिहारला त्याच्या मुळगावी पसार झाला असावा असा संशय सध्या पोलिसांना आहे.

वाचा – आता विजय माल्ल्याच्या हेलिकॉप्टरचा होणार लिलाव

वाचा – अरूण जेटलींमुळेच विजय माल्ल्या पळाला – राहुल गांधी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -