राज्यातली जनता शिवसेनेवर देखील असाच बुलडोजर चालवताना दिसेल- अतुल भातखळकर

Atul Bhatkhalkar
अतुल भातखळकरांचा शिवसेनेला टोला

अभिनेत्री कंगना रणावत आणि खासदार संजय राऊत यांच्यात गेले काही दिवस सुरू असलेल्या शाब्दिक चकमकीनंतर. कंगना आज मुंबईत दाखल होत आहे. पण त्याआधीच कंगना रणौतच्या जुहू येथील कार्यालयामधील अनधिकृत बांधकामावर मुंबई महापालिकेकडून हातोड चालवला जात आहे. पालिकेने कंगनाच्या कार्यालयावर केलेल्या कारवाईनंतर भाजपाचे मुंबईतील आमदार आणि प्रदेश सरचिटणीस अतुल भातखळकर यांनी ट्विट करत शिवसेनेवर टीका केली आहे. अतुल भातखळकर यांनी ‘राज्यातील जनता शिवसेनेवर  लवकरच असाच बुलडोजर चालवताना दिसणार आहे.’ असं म्हटलं आहे.

तर त्यांनी आणखी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये म्हचलं आहे की, शिवसेनेने हा मर्द वांद्र्यातील घुसखोरांच्या चार मजली झोपड्यांवरही दाखवा.

आमदार अतुल भातखळकर यांनी कंगनाच्या कार्यालयावर होणारी कारवाई आणि वांद्रेतील झोपडपट्टीचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना त्यांनी म्हटलं आहे की, ‘शिवसेनेचा पुरुषार्थ…हा मर्द पणा जरा वांद्र्यातील घुसखोरांच्या चार मजली झोपड्यांवरही दाखवा…’

 

सध्या कंगनाच्या कार्यालयावर सुरू असणारी कारवाई पालिकेने थांबवली आहे. कंगनाच्या वकिलांनी महापालिकेकडून जुहू येथील कार्यालयावर करण्यात येत असलेल्या कारवाईविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली  आहे. सुनावणीला सुरूवात झाली आहे. उच्च न्यायालयात सुनावणी असल्याने पालिकेकडून कारवाई तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.


हे ही वाचा – कंगनाच्या बंगल्यावर हातोडा, कंगनाने दिली ‘बाबर’,’पाकिस्तानची’ उपमा!