घरमुंबईविधानपरिषदेत आज स्थगन प्रस्तावावरून गोंधळ

विधानपरिषदेत आज स्थगन प्रस्तावावरून गोंधळ

Subscribe

आजवर आपण १९७२ च्या दुष्काळाचे उदाहरण देत होतो पण येणारी पिढी आजच्या दुष्काळाचे उदाहरण देईल, असे सांगत विरोधकांनी स्थगन प्रस्तावाची मागणी केली. 

मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, मुस्लिम आरक्षण आणि राज्यातील भीषण दुष्काळ या मुद्द्यांवरून सरकारला कोंडीत पकडण्याच्या इराद्याने आलेल्या विरोधकांनी, आज विधान परिषदेत २८९ अन्वये दुष्काळावर स्थगन प्रस्तावाची मागणी केली. मात्र, हे सरकार गंभीर नाही असा आरोप करत सभागृहात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मात्र, धनंजय मुंडे यांनी त्यामुळे सभापतींना सुरूवातीला अर्धा तास आणि पुन्हा सभागृह सुरू झाल्यानंतर पूर्ण दिवसासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले. राज्यातील शेतकरी, मराठा, धनगर आणि मुस्लिम या चार मोठ्या घटकांचे या अधिवेशनावर लक्ष लागले आहे. त्यातच दुष्काळ जाहीर होऊन २२ दिवस झाले तरीही अद्याप कोणतेच नियोजन या सरकारने केलेले नाही, असा आरोप करत सभागृहात सरकार विरोधात जोरदार हल्लाबोल केला. आजवर आपण १९७२ च्या दुष्काळाचे उदाहरण देत होतो पण येणारी पिढी आजच्या दुष्काळाचे उदाहरण देईल, असे सांगत त्यांनी स्थगन प्रस्तावाची मागणी केली.

विरोधक उतरले ‘वेल’मध्ये 

दरम्यान विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मागणी करताच त्यांना साथ देण्यासाठी सर्व आमदार वेल मध्ये उतरले आणि त्यांनी दुष्काळ, आरक्षणावरून सरकारविरोधात घोषणाबाजी दिल्याने सभापतींना सुरुवातीला ३० मिनिटे कामकाज तहकूब करावे लागले.

दुष्काळाचे निकष अमान्य – भाई जगताप

दरम्यान काँग्रेसचे आमदार भाई जगतापही आज सभागृहात आक्रमक दिसले. राज्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती असताना सरकारची पळ काढण्याची भूमिका असल्याचा आरोप त्यांनी करत सरकार वस्तुस्थितीपासून पळ काढत आहे. ज्यावेळी दुष्काळ जाहीर झाला. तेव्हा जे निकष वापरले गेले ते सर्वांना माहीत आहे. मात्र ज्या केंद्राच्या निकषावरून दुष्काळ जाहीर केला तेच केंद्राचे निकष इतर आठ राज्यांनी अमान्य केले असा आरोप देखील भाई जगताप यांनी केला.

विरोधक फक्त राजकारण करतायेत – चंद्रकांत पाटील

सरकारला अहवाल सभागृहात मांडणे बंधनकारक नाही, तरीदेखील अहवाल पटलावर ठेवू शकतो*
असे सांगत विरोधक नुसते राजकारण करत असल्याचा आरोप महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केला. ओबीसांच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही आरक्षण देऊ, असेही त्यांनी सांगितले.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -