घरमुंबई...तर मुंबईत पाणी कपात वर्षभर राहील!

…तर मुंबईत पाणी कपात वर्षभर राहील!

Subscribe

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांत पावसाने पाठ फिरवल्याने पाहिले दोन महिने कोरडेच गेले. त्यामुळे मागील दोन वर्षांच्या तुलनेत हा पाणी साठा निम्यापेक्षा कमी असल्याने महापालिका प्रशासनाने ५ ऑगस्ट पासून २० टक्के पाणी कपात जाहीर केली आहे. मात्र ही कपात आता पहिल्या टप्प्यात फेब्रुवारीपर्यंत कायम राहणार आहे. तलावातील पाण्याची पातळी समाधानकारक झाली तरी ही कपात फेब्रुवारीपर्यंत कायम ठेवली जाईल. मात्र, पाणी साठा कमी असल्यास पाणीकपात पुढील वर्षीच्या ऑगस्ट महिन्यापर्यंत लागू राहील असे बोलले जात आहे.

मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी आदी तलाव तसेच धरणांमधून दरदिवशी होणाऱ्या ३८५० दशलक्ष लिटर अर्थात ३८५ कोटी लिटर एवढ्या पाण्याचा पुरवठा होता. मात्र तलाव क्षेत्रात मागील जून महिन कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यांत पडलेल्या पावसामुळे काही प्रमाणात पाण्याच्या पातळीत वाढ झाली असली तरी ती समाधानकारक नाही. १ ऑगस्ट रोजी या सर्व तलावांत ५ लाख ०१ हजार दशलक्ष अर्थात ५० हजार कोटी लिटर एवढा पाण्याचा साठा जमा झाला आहे.

- Advertisement -

तलाव क्षेत्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने जुलै महिन्‍याच्‍या शेवटच्‍या आठवड्यात मुंबईस पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्‍ये फक्‍त सुमारे ३४.६३ टक्‍के जलसाठा उपलब्‍ध आहे. हा जलसाठा १ ऑगस्ट २०१९ मध्‍ये ८६.९० टक्‍के आणि जुलै २०१८ मध्‍ये ८३.४६टक्‍के होता. हीच परिस्थिती यापुढेही राहिल्‍यास पावसाळा संपल्‍यानंतरसुद्धा महापालिकेकडे पुरेसा जलसाठा उपलब्‍ध होऊ शकणार नाही. मुंबईचा पाणीपुरवठा ३१ जुलै २०२१ पर्यंत सुरळीपणे चालू ठेवण्‍यासाठी पाणीपुरवठ्यात ५ ऑगस्‍ट २०२० पासून २० टक्‍के पाणीकपात करण्‍यात येणार आहे.

महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सध्या तलावातील पाण्याची पातळी खूपच कमी आहे. या दोन महिने थोडे कोरडे गेले असले तरी ऑगस्ट महिन्यात या भागात मुसळधार पाऊस पडून पाण्याची पातळी योग्य प्रमाणात वाढेल. त्यामुळे आज संकट दिसत असले तरी ते दूर होईल. पण सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा २० टक्के पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तलावातील पाणी साठा वाढून ११ ते १२ लाख दशलक्ष लिटर पर्यंत जाईल. त्यामुळे एवढा पाणी साठा जमा झाल्यास ही कपात पुढील ऑगस्ट २०२१ पर्यंत कायम राहील. पण १३ लाख दशलक्ष लिटर पर्यंत राहिल्यास ही कपात फेब्रुवारी २०२१ पर्यंत राहील असे त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -