कुर्ल्यात साडेतीन वर्षाच्या मुलासह आईने केली आत्महत्या

साडेतीन वर्षीय चिमूरड्याची हत्या करून आईने आत्महत्या करण्याची घटना कुर्ला परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा नोंदवला असून आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Kurla
A 14-year-old boy committed suicide due to his father's failure to providing Android mobile
प्रातिनिधक फोटो

साडेतीन वर्षाच्या मुलाची हत्या करून मातेने गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना कुर्ला पश्चिम बैलबाजार येथे मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली आहे. या प्रकरणी विनोबा भावे नगर पोलीसानी मुलाची हत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आत्महत्येचे कारण कळू शकलेले नाही. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दीपक वंजारी (साडेतीन वर्ष) आणि आई अनुजा (२८) असे मृतांची नावे आहेत.

कशी घडली घटना

कुर्ला पश्चिम बैलबाजार येथील गुरुदत्त सोसायटी या ठिकाणी अनुजा ही पती दीपक मुलगा आणि सासू यांच्यासोबत राहण्यास होती. पती एका खाजगी कंपनीत नोकरीला असून सासू देखील मुंबई विमानतळ येथे नोकरी आहे. मंगळवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अनुजा हिची सासू घरी आली असता घर आतून बंद असल्याचे आढळूण आले.  अनुजाला हाका मारूनही आतून काही प्रतिसाद आला नाही. दरम्यान चाळीतील एका रहिवाशाने खिडकीतून आत डोकावले असता अनुजा गळफास लावलेल्या अवस्थेत दिसून आली. स्थनिक नागरिकांनी याबाबत पोलिसांना कळवले असता विनोबा भावे नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थनिकांच्या मदतीने पोलिसांनी वंजारी यांच्या दरवाजाची आतून लावण्यात आलेली कडी तोडून घरात प्रवेश केला असता अनुजा आणि मुलगा मृत अवस्थेत आढळून आले. आईने चिमुरड्या मुलाची ओढणीने गाला आवळून हत्या केल्यानंतर अनुजाने गळफास लावून स्वतः आत्महत्या केली असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले असल्याची माहिती पोलिसानी दिली असून आत्महत्यांचे कारण अद्याप कळू शकलेले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. अनुजा हिचे आईवडील रविवारी टिटवाळा येथे एका नातेवाईकाच्या लग्नासाठी आले होते, त्यानंतर कुर्ला येथे येऊन मुलगी अनुजा आणि नातवाला भेटून सोमवारीच गावी निघून गेले होते अशी माहिती स्थनिक नागरिकांनी दिली.