घरमुंबईशहापूरमधील बसच्या धडकेत महिलेचा मृत्यु

शहापूरमधील बसच्या धडकेत महिलेचा मृत्यु

Subscribe

रस्ता ओलांडत असताना बसने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात महिला जागीच ठार झाल्याची घटना धक्कादायक घटना आज, गुरुवारी सकाळी शहापूर तालुक्यातील धसई येथे घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शहापूर परिवहन महामंडळाची बस (क्रमांक एम.एच. २० डी ८८८२) ही चोंढे येथून शहापूरकडे सकाळी ९.३० च्या सुमारास येत असताना धसई बस थांब्याजवळ रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या वनिता कडव (वय ४६) यांना समोरुन येणाऱ्या भरधाव बसची जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात बस खाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, या अपघाताच्या घटनेनंतर बसचालकाने घटनास्थळावरून बससह पळ काढला. बस शहापूर आगारात आणण्याचा प्रयत्न  करत असताना धसई येथील ग्रामस्थांनी बसचा पाठलाग करत ही बस शहापूर येथे अडवून बसचालक प्रशांत भगवान गोटे याला तात्काळ पोलिसांच्या स्वाधिन केले. या अपघाताप्रकरणी शहापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अपघाताच्या या दुर्दैवी घटनेमुळे शहापूर तालुक्यात एकच हळहळ व्यक्त होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -