घरमुंबईभुज - दादर एक्स्प्रेसमध्ये महिलेची हत्या

भुज – दादर एक्स्प्रेसमध्ये महिलेची हत्या

Subscribe

भुज - दादर एक्स्प्रेसमध्ये महिलेची गळा चिरुन हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

सूरतहून मुंबईकडे येणाऱ्या भूज – दादर एक्स्प्रेसमध्ये महिलेची गळा चिरुन हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका ४० वर्षीय महिलेची गळा चिरुन हत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. भूज – दादर एक्स्प्रेस दादर स्थानकात पोहोचल्यानंतर हा गुन्हा उघडकीस आला आहे. एक्स्प्रेसच्या शेवटच्या महिला डब्यात या महिलेचा मृतदेह आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. दाडिया देवी असे या महिलेचे नाव आहे. हत्येनंतर या महिलेच्या अंगावर एकही दागिना आणि त्यांच्याजवळ रक्कम नसल्याने ही हत्या लुटण्याच्या उद्देशाने केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा गुन्हा मुंबई सेंट्रल स्थानकात नोंदवण्यात आला असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास घेत आहेत. या घटनेमुळे पुन्हा एकदा महिलांसाठी रेल्वेचा प्रवास देखील असुरक्षित असल्याचे समोर आले आहे.

नेमके काय घडले?

सूरतहून मुंबईकडे येणारी भूज – दादर एक्स्प्रेस दादर या स्थानकात पोहोचली. एक्स्प्रेस दादर या स्थानकात पोहोचल्यानंतर आरपीएफचे जवान गाडी चेक करत होते. त्यादरम्यान त्यांना धारदार शस्त्राने खून केल्याचा मृतदेह आढळून आला. या महिलेच्या गळ्यावर, दोन्ही हातावर आणि छातीवर शस्त्रानं वार करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार दाडिया देवी या सूरतमधील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. दाडिया देवी या वडाळ्यातल्या आपल्या बहिणीकडे येत होत्या. सूरत इथून त्या ट्रेनमध्ये चढल्या आणि शुक्रवारी दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान या महिलेची निर्घृण हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी जीआरपीएफ सर्व स्थानकाचे सीसीटीव्ही फुटेज तपास आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -