घटस्थापनेच्या मुहूर्तावर मोठा निर्णय; महिलांना लोकलने प्रवासाची मुभा!

women in mumbai local train

नवरात्रौत्सवाची सुरूवात राज्य सरकारने आनंदाची बातमी देऊन केली आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर ठाकरे सरकारने सर्व महिलांना लोकलने प्रवास करण्याची मुभा दिली आहे. याबाबतचे पत्रक राज्य सरकारने जारी केले असून यामध्ये ही माहिती नमूद करण्यात आली आहे. कोरोनाच्या संकट काळात २२ मार्चच्या मध्यरात्रीपासून लोकल सेवा बंद करण्यात आली होती. मात्र अनलॉकच्या प्रक्रियेनंतर ती सुरू करण्यात आली. पंरतू ठरावीक कर्मचारी वर्गांनाचा ही सेवा उपलब्ध होती. मात्र नवरात्री सणाच्या निमित्ताने सरकारने सर्व महिलांसाठी मोठी भेट देत ही सेवा घेण्यास परवानगी दिली आहे.

राज्य सरकारचे पत्रकर जारी

मात्र वेळेची मर्यादा 

महिलांना प्रवासाची मुभा दिली असली तरी वेळेची मर्यादादेखील दिली आहे. हा प्रवास सकाळी ११ ते दुपारी ३ च्या दरम्यानच करता येणार आहे. तसेच सायंकाळी ७ ते शेवटच्या रेल्वेपर्यंत त्यांना प्रवास करता येणार आहे. यापुढे महिलांना रेल्वेने प्रवासाकरता क्यू आर कोड बंधनकारक नसणार आहे. मात्र ही सेवा फक्त महिलांकरता पूर्ववत झाली असून पुरुषांना मात्र अजूनही काही दिवस लोकल प्रवासासाठी वाट पहावी लागणार आहे.

हेही वाचा –

मुंबईवरून संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावता येत नाही; सुप्रीम कोर्टाने