घरट्रेंडिंगVideo: तिने पगार मागितला म्हणून केली भररस्त्यात मारहाण!

Video: तिने पगार मागितला म्हणून केली भररस्त्यात मारहाण!

Subscribe

फक्त हक्काचा पगार मागितला, म्हणून एका तरूणीला जमावाने भररस्त्यात मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

एकीकडे देशभरात महिला सशक्तीकरण, स्त्रियांचे हक्क, स्त्रियांवरील अत्याचारांवर उठवले जाणारे आवाज, स्त्रियांचं राजकारणातलं अस्तित्व-महत्त्व अशा मुद्द्यांवर चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे महिलांवर होणारा अन्याय काही कमी होताना दिसत नाही. एका तरुणीने फक्त तिच्या हक्काचा पगार मागितला, म्हणून तिला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या नोएडा भागामध्ये घडला आहे. या प्रकारामुळे आसपासच्या परिसरामध्ये तणावाचं वातावरण असून पीडित तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी लागलीच तपास करून संबंधित आरोपीला अटक केली आहे.

UP Women Beat Accused
उत्तर प्रदेश तरुणी मारहाण

का मारलं या तरुणीला?

नोएडाच्या नॉलेज पार्कमध्ये ही गंभीर घटना घडली आहे. पीडित तरुणी या परिसरातल्या शमसुद्दीन नावाच्या व्यक्तीच्या सलूनमध्ये काम करते. १२ मे अर्थात रविवारी सकाळी सदर तरुणीने पगाराविषयी मालकाकडे विचारणा केली. या मुद्द्यावर दोघांमध्ये वाद झाला. तो वाद इतका टोकाला गेला, की त्यांच्यामध्ये हाणामारी होऊ लागली. शमसुद्दीनने पीडित तरुणीला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. तिच्या केसांना धरून त्याने तिला भररस्त्यात ओढून नेले. तसेच, तिथे जमा झालेल्या त्याच्या काही मित्रांनी देखील तरुणीला मारहाण केली. इतर काही लोकांनी मध्ये पडून तरुणीची सुटका केली. या प्रकरणाचा एक व्हिडिओच एका प्रत्यक्षदर्शीने शूट करून उत्तर प्रदेश पोलिसांना टॅग करून ट्विटरवर टाकला.

- Advertisement -

दरम्यान, हा व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल झाल्यानंतर पीडित तरुणीने देखील याविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणाची दखल घेत व्हिडिओच्या माध्यमातून आणि तरुणीच्या तक्रारीवरून उत्तर प्रदेश पोलिसांनी लागलीच तपास सुरू केला आणि सलूनचा मालक शमसुद्दीनला अटक केली. त्याच्या विरोधात पोलिसांनी कलम १७४/१९ नुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच, ट्विटरवर या कारवाईसंदर्भात पोलिसांनी ट्विट करून माहिती देखील दिली आहे.

- Advertisement -


हेही वाचा – एटीएममध्ये तरुणीसोबत अश्लिल चाळे; विक्षिप्त तरुणाला अटक
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -