घरमुंबईमहिलेचा सात वर्ष एचसीव्हीशी यशस्वी लढा

महिलेचा सात वर्ष एचसीव्हीशी यशस्वी लढा

Subscribe

पूर्वी एचसीव्हीवरील उपचार कठीण होते आणि त्यासाठी आठवड्यातून एकदा असे वर्षभर इंजेक्शन घ्यावे लागत होते. शिवाय या उपचारांना रुग्णांनी प्रतिसाद देण्याचे प्रमाण फारसे चांगले नव्हते. हे उपचार केवळ ५० ते ८० टक्के रुग्णांमध्येच यशस्वी ठरले होते.

५९ वर्षीय महिला रिमा राय (बदललेले नाव) या २०१३ सालापासून एचव्हीसी पॉझिटिव्ह होत्या. सुरुवातीला रिमा यांच्यावर सलग एक वर्ष इंजेक्शनने उपचार केला गेला. पण,‌ या उपचारादरम्यान त्यांच्या प्रकृतीत कुठल्याही प्रकारची सुधारणा होत नव्हती. या दरम्यान मौखिक औषधांनीही त्यांच्यावर उपचार‌ केले गेले. मौखिक औषधांच्या आधी इंटरफेरॉन आणि रिबाविरिनच्या माध्यमातून उपचार केले जात होते. ही या आजारावर सर्वात जुनी उपचार पद्धती होती. पण, कोणतीच उपचार पद्धती त्यांच्यावर लागू पडत नव्हती.

ग्लोबल हॉस्पिटलमध्ये पडला फरक

अखेर मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले. तिथे त्यांना तोंडावाटे घेण्याची नवीन औषधे देण्यात आली. एचसीव्हीसाठी तोंडावाटे सोफोस्बुव्हिर, व्हेल्पाटस्व्हिर आणि रिबॅव्हायरिन असे औषधे त्यांना सहा महिने देण्यात आले. रिमा यांनी या उपचारांना चांगला प्रतिसाद दिला आणि त्यांच्या शरीरातील विषाणू नष्ट झाले. हा विषाणू या टप्प्यावर नष्ट झाला नसला तर रुग्णाला यकृताचे विकार तसंच यकृताचा कॅन्सरही होण्याचा धोका होता.

रुग्णावर बराच काळ वेगवेगळ्या औषधांच्या प्रणालींसह उपचार करण्यात आले. एचसीव्हीसी या आजारात औषधांचा एक योग्य समूह निवडून आणि त्यात रिबॅव्हिरिन या एका नव्या औषधाची भर घालून हे शक्य झाले. आता त्यांची प्रकृती उत्तम आहे.
– डॉ. समीर शहा, हेपॅटोलॉजी विभाग प्रमुख, ग्लोबल हॉस्पिटल
- Advertisement -

मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये १९३ रुग्णांवर तोंडावाटे घेण्याच्या नवीन औषधांसह उपचार करण्यात आले आहेत आणि त्यातील ९८ टक्के रुग्णांनी या औषधांना चांगला प्रतिसाद दिला आहे. भारतातील ८ केंद्रांतील हेपॅटायटिस सी विषाणूची (एचसीव्ही) लागण झालेल्या ९४६ रुग्णांची माहिती एकत्रित करण्यात आली आहे. ग्लोबल हॉस्पिटलमधील वरिष्ठ क्लिनिकल संशोधन समन्वयक डॉ. मृणाल कामत यांनी सांगितले की, ही माहिती ‘फाइंडिंग्ज फ्रॉम अ लार्ज एशिअन क्रॉनिक हेपॅटायटिस सी रिअल-लाइफ स्टडी’ या नावाने प्रसिद्ध करण्यात आली आहे. या माहितीवरून भारतातील ९५ टक्के रुग्णांमधील हा विषाणू नष्ट करणे शक्य होते असं दिसून येतं.

हेपॅटायटिस सी म्हणजे काय ?

हेपॅटायटिस सी हा एक मूकपणे अपाय करणारा आजार समजला जातो. याचा परिणाम यकृताचा सोरायसिस किंवा यकृताच्या कॅन्सरमध्ये होऊ शकतो. भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी १-२ टक्के जणांना हा विकार होतो. पूर्वी एचसीव्हीवरील उपचार कठीण होते आणि त्यासाठी आठवड्यातून एकदा असे वर्षभर इंजेक्शन घ्यावे लागत होते. शिवाय या उपचारांना रुग्णांनी प्रतिसाद देण्याचे प्रमाण फारसे चांगले नव्हते. हे उपचार केवळ ५० ते ८० टक्के रुग्णांमध्येच यशस्वी ठरले होते. शिवाय या उपचारांसोबत ताप, केस गळणे, थायरॉइडचे विकार असे अनेक साइड इफेक्ट्स दिसत होते. नवीन उपचार आता उपलब्ध झाले आहेत. यामध्ये ३ ते ६ महिने केवळ एक गोळी घ्यावी लागते आणि हेपॅटायटिस सीचा विषाणू ९५ टक्क्यांहून अधिक नाहीसा होतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -