चारित्र्यावर संशय; रॉकेल टाकून पत्नीला पेटवणाऱ्या पतीला अटक

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिल्याची घटना उल्हासनगरात घडली असून गंभीर जखमी झालेल्या त्या महिलेला उपचारासाठी जे.जे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Ulhasnagar
Ulhasnagar burn case victim's death
चारित्र्यावर संशय, रॉकेल टाकून पत्नीला पेटवणाऱ्या पतीला अटक
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिल्याची घटना उल्हासनगरात घडली असून गंभीर जखमी झालेल्या त्या महिलेला उपचारासाठी जे.जे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पत्नीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्या नवऱ्याला मध्यवर्ती पोलिसांनी अटक केली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या त्या इसमाचे नाव मनोजकुमार दुर्गाप्रसाद यादव (३५) असून तो कॅम्प ३ येथील शांतीनगर परिसरातील गोबाईपाडा परिसरात राहणारा आहे. मनोजकुमार हा त्याची पत्नी सुरेखा (३०) हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. सुरेखा ही घरात असताना मनोजकुमार घरी आला. त्याने पत्नीजवळील मोबाईल फोन हिसकावून घेऊन हा मोबाईल फोन कुठून आणला असे प्रश्न विचारत तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन भांडण केले. त्या भांडणात मनोजकुमार याने घरातील स्टोमधील रॉकेल सुरेखा हिच्या अंगावर ओतून तिला पेटवून दिले. त्यात ती गंभीर भाजल्याने तिला उपचारासाठी प्रथम उल्हासनगरातील मध्यवर्ती हॉस्पिटल आणि तेथून मुंबईतील जे.जे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
सुरेखा हिने दिलेल्या जबाबावरून मध्यवर्ती पोलिस ठाण्यात मनोजकुमार यादव याच्याविरूद्ध पत्नीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उप निरीक्षक एम.डी.राळेभात करत आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here