घरमुंबईमुंबईमधील महिलांच्या मदतीला येणार ड्रोन!

मुंबईमधील महिलांच्या मदतीला येणार ड्रोन!

Subscribe

मुंबईतील महिलांच्या मदतीला आता ड्रोन धावून येणार आहे. महिलांसाठी मुंबई सुरक्षित व्हावी म्हणून हा प्रकल्प हाती घेण्यात येईल. या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च 250 कोटी रुपये असून, त्यात ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर केला जाणार आहे.
एखादी महिला अडचणीत असेल तर तिने बटण दाबायचे. त्यामुळे कॅमेऱ्यांनी सज्ज असलेला ड्रोन कार्यरत होईल. तसेच या बटणामुळे जवळील पोलीस ठाण्यालाही सतर्क करण्यात येईल.

ड्रोन कार्यरत झाल्यानंतर तो तातडीने घटनास्थळी रवाना होणार आहे. तेथून तो पोलीस कंट्रोल रुमला घडत असलेल्या घटनेचे थेट प्रक्षेपण करणार आहे. त्यामुळे पोलिसांना गुन्हा घडत असलेल्या ठिकाणी तातडीने पोहचण्यास मदत होणार आहे. आधुनिक सॉफ्ट वेअरने ड्रोनला मोबाईल अ‍ॅप्लिकेशनशी जोडण्यात येणार आहे. एखाद्या महिलेने हा मोबाईल अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड केला की, तिला पॅनिक बटण दाबता येणार आहे. एकदा पॅनिक बटण दाबले की, मोबाईल कार्यरत होऊन तातडीने घटनास्थळी जाणार आहे.

- Advertisement -

महिलांच्या सुरक्षेप्रमाणेच मुंबई पोलीस या यंत्रणेचा वापर अनेक इतरही आपात परिस्थितीत करू शकणार आहेत. गर्दीच्या ठिकाणांवर लक्ष ठेवण्यासाठीही या ड्रोनचा वापर होणार आहे. विशेषत: गणेश विसर्जन, राजकीय सभा आणि खेळांच्या सामन्यांसारख्या गर्दीच्या ठिकाणीही या ड्रोनचा वापर गेला जाणार आहे.

ड्रोनचा वापर मुंबईच्या सुरक्षेसाठी करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईची योग्य सुरक्षा राखणे शक्य होणार आहे. आतापर्यंत मुंबईच्या ज्या भागांची तपासणी करणे शक्य नव्हते त्या भागांची ड्रोनच्या मदतीने टेहळणी करणे शक्य होणार आहे.
– दीपक देवराज, पोलीस उपायुक्त.

- Advertisement -

कशी मिळणार मदत ?

1) आपात परिस्थितीत महिलेने मोबाईल अ‍ॅप्लिकेशनमधील पॅनिक बटण दाबायचे.
2) बटण दाबताच ड्रोन कार्यरत होणार.
3) ड्रोन तातडीने घटनास्थळी पोहचणार
4) ड्रोनच्या माध्यमातून पोलीस कंट्रोल रुमला घटनास्थळाचे थेट प्रक्षेपण पाहता येणार
5) त्याद्वारे थेट स्थानिक पोलिसांना अलर्ट करून त्यांना घटनास्थळी त्वरीत पोहचण्यास मदत होणार
6) पॅनिक बटण दाबताच स्थानिक पोलीस ठाण्यातही अलार्म वाजून त्यांना अलर्ट केले जाणार

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -