घरमुंबईमहिला दिनानिमित्त पुरुषांनी दिली महिलांना अनोखी भेट

महिला दिनानिमित्त पुरुषांनी दिली महिलांना अनोखी भेट

Subscribe

महिला दिनानिमित्त कोहिनूर हॉस्पीटलमध्ये तणावमुक्त जीवन जगण्यासाठी महिलांना प्रेरणा देण्यात आली. तसेच पुरूषांनी महिलांचे मनोरंजन करत त्यांना अनोखी भेट दिली. या उपक्रमात ५० हून अधिक जोडप्यांनी सहभाग घेतला होता.

जागतिक महिला दिनानिमित्त कुटुंबातील महिलेविषयी आदरयुक्त भावना, प्रेम व्यक्त करण्यासाठी मुंबईतील कोहिनुर हॉस्पीटलच्या वतीने एक आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये सहभागी पुरुषांनी त्यांचे कौशल्य पणाला लावत घरातील महिलेकरिता सलाड डेकोरेशन, मिमिक्री, नृत्य, संगीत आदी कला सादर करत महिला दिनाची विशेष भेट दिली. कोहिनूर हॉस्पीटलमध्ये रंगलेल्या या उपक्रमात ज्येष्ठांनी देखील सहभाग घेतला असून तितक्याच उत्साहात त्यांनी घरातील महिलेविषयी प्रेम व्यक्त करत ‘महिलांच्या योगदानाविषयी जाणीव असणे गरजेचे आहे’ असा मोलाचा संदेश दिला. या उपक्रमामध्ये ५०हून अधिक जोडपी सहभागी झाली होती.

पुरुषांनी केले महिलांचे मनोरंजन

महिला दिन विशेष उपक्रमात कोहिनूर हॉस्पीटलचे जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ. गुरविंदर सिंग स्वहानी यांनी उपस्थित महिलावर्गाला मार्गदर्शन करताना गुडघ्यांची काळजी कशी घ्यावी, जीमला जाणाऱ्या महिलेने व्यायाम करताना अवयवांची काळजी कशी घ्यावी याविषयी माहिती दिली. सांधेदुखी सारख्या समस्येवर कशा प्रकारे उपचार करता येतील याविषयी देखील मार्गदर्शन केले. घरातील प्रत्येक महिलेविषयी आदर, प्रेम आणि काळजी व्यक्त करण्यासाठी याठिकाणी कोहिनूर हॉस्पीटलच्या वतीने एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले होते. याठिकाणी उपस्थित पुरुषांनी त्यांच्यातील सुप्त कलागुण सादर करत महिलांचे मनोरंजन केले.

- Advertisement -
kohinoor hospital
महिला दिनानिमित्त पुरुषांनी दिली महिलांना अनोखी भेट

तणावमुक्त जीवना जगण्याची प्रेरणा

चूल, मुल आणि ऑफीस अशा तिहेरी भूमिकांमध्ये स्वतःचे अस्तित्व विसरलेल्या महिलांना यानिमित्ताने त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देत प्रत्येक भूमिकेमध्ये घरातील पुरुषांची नक्की साथ दिली जाईल असा निश्चय ही यानिमित्ताने करण्यात आला. यावेळी कार्यक्रमात सहभागी पुरुषांनी स्वतः सॅंडविच तसेच सलाड मेकिंग करत बायकोला एक अनोखी भेट दिली. डायटिशियन विदीशा पारेख यांनी आहाराती कडधान्य, फळे तसेच सकाळच्या न्याहारीचे महत्त्व सांगितले. प्रत्येक वयोगटातील व्यक्तीला आवडतील अशा पोषक पाककृती याठिकाणी स्वतः शेफ यांनी सादर केल्या. धावपळीची जीवनशैली आणि वाढत्या ताणतणावामुळे महिलावर्गामध्ये आरोग्याच्या समस्या वाढत असून या उपक्रमाच्या माध्यमातून तणावमुक्त जीवन जगण्यासाठी महिलांना प्रेरणा देण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -