घरमुंबईटेंभा आरोग्यकेंद्राचे काम उपकेंद्रातून

टेंभा आरोग्यकेंद्राचे काम उपकेंद्रातून

Subscribe

गोरगरीब रुग्णांची हेेेळसांड

शहापूर तालुक्यातील खर्डी परिसरातील अतिदुर्गम आदिवासी बहुल भाग असलेल्या टेंभा येथे आरोग्य केंद्रास मान्यता मिळाली, पण जागेअभावी आरोग्य केंद्राची इमारत रखडल्याने आरोग्य केंद्राचा कारभार चक्क एका जुन्या पडझड झालेल्या उपकेंद्रात सुरू असल्याचे समोर आले आहे.

शहापूर पासून 30 किलोमीटर अंतरावर टेंभा हे गाव आहे. 2012 साली राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने येथे आरोग्य केंद्र घोषित केले. पण आरोग्य केंद्र उभे करण्यासाठी जागाच उपलब्ध केली नाही. त्यामुळे येथे आरोग्य केंद्रास इमारतच बांधली नसल्याने हे आरोग्य केंद्र टेंभा येथील एका जुन्या पडझड झालेल्या उपकेंद्रात सुरू करण्याची दुर्दैवी वेळ ठाणे जिल्हा आरोग्य अधिकारी (डिएचओ) व शहापूर तालुका आरोग्य अधिकारी यांच्यावर आली आहे. एकूण 30 गावे 58 आदिवासी पाडे या आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात येत आहेत. या आरोग्य केंद्रात 2 डॉक्टर, 8 परिचारिका, 3 तात्पुरत्या कंत्राटी आरोग्य सेविका, 10 आरोग्य सहाय्यक, 1 महिला आरोग्य सेविका असे एकूण 24 आरोग्य अधिकारी-आरोग्य कर्मचारी टेंभा आरोग्य केंद्रात काम करीत आहेत. मात्र, कोणत्याही धड सुविधा नसलेल्या या उपकेंद्रात आरोग्य कर्मचार्‍यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अपुर्‍या व अरुंद अशा खोल्यांमध्ये अगदी दाटीवाटीने आरोग्य केंद्र चालवले जात आहे.

- Advertisement -

ओपिडीत उपचारासाठी येणार्‍या रुग्णांवर जागे अभावी दाखल करून घेता येत नाही. त्यामुळे गंभीर आजार व अपघातग्रस्त रुग्णास खर्डी व शहापूर येथे पाठविले जाते. उपकेंद्रात औषधांचा साठादेखील ओपडी रुम मध्ये दाटीवाटीने ठेवण्यात आला आहे. प्रसुतीसाठी अध्यावत रुम नाही. तर येथील प्रसाधनगृह, शौचालये देखील अस्वच्छ आहेत.

आरोग्य केंद्रास इमारत नसल्याने डॉक्टर व इतर कर्मचारी परिचारीकांना राहण्यास निवास्थाने नसल्याने रात्रपाळी ची ड्युटी करणार्‍या आरोग्य कर्मचार्‍यांना असुरक्षित रहावे लागत आहे. यामुळे त्यांना अनेक समस्यांना तोंड देत खूप त्रास सहन करावा लागत आहे. टेंभा उपकेंद्रात सुविधा नसल्याने आदिवासी गोरगरीब रुग्णांची अक्षरशः येथे हेळसांड सुरू असून आरोग्य केंद्राला मंजुरी मिळाली. पण आरोग्य केंद्रच सुरू न झाल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. लवकरात लवकर आरोग्य केंद्र इमारत उभी न केल्यास काही समाजिक संस्था आता आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.

- Advertisement -

टेंभा आरोग्य केंद्राची नवीन इमारत बांधण्यासाठी जागा उपलब्ध व्हावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून साधारण महसूल विभागाकडून एक एकर जागा उपलब्ध होणार आहे. याकरता जागेचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. हा प्रस्ताव ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला आहे.
– तरुलता धानके, शहापूर तालुका आरोग्य अधिकारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -