घरमुंबईइमारतीवरुन पडून कामगाराच्या छातीतून डोक्यापर्यंत घुसली सळई

इमारतीवरुन पडून कामगाराच्या छातीतून डोक्यापर्यंत घुसली सळई

Subscribe

या कामगारावर शस्त्रक्रियाकरुन सळई काढण्यात आली. सलग पाच तास ही शस्त्रक्रिया सुरु होती. मेंदुला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिनीला गंभीर दुखापत झाल्याने ही शस्त्रक्रिया करणे त्यांच्यासमोर मोठं आव्हान होती.

चेंबूर येथे इमारतीवरुन पडून एक कामगार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. १३ फूटावरुन पडून एका कामगाराच्या छातीपासून ते डोक्यापर्यंत सळई घुसली. या अपघातामध्ये २४ वर्षाचा राजेश जाधव हा कामगार गंभीर जखमी झाला आहे. मंगळवारी ही घटना घडली आहे. प्रसंगावधान राखून घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या इतर कामगारांनी त्याला ताबडतोब चेंबूरच्या झेन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. दरम्यान या हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

असे वाचवले प्राण

झेन हॉस्पिटलमधील दरम्यान डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतर या कामगाराचा जीव वाचवण्यात यश आले आहे. या कामगारावर शस्त्रक्रियाकरुन सळई काढण्यात आली. सलग पाच तास ही शस्त्रक्रिया सुरु होती. डॉ. बटुक डिओरा, डॉ. प्रमोद मस्जीद, डॉ. प्रमोद काळे तसेच त्यांच्या टिमने केलेल्या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे त्यांचे कौतुक केले जात आहे. मेंदुला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिनीला गंभीर दुखापत झाल्याने ही शस्त्रक्रिया करणे त्यांच्यासमोर मोठं आव्हान होते. अशा प्रकरणात रुग्णाचा मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती असे झेन रुग्णालयाचे संचालक डॉ. रॉय पाटणकर यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -