अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीचे कामगार संप करणार

Workers of Adani Electricity Company will go on strike
अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीचे कामगार संप करणार

प्रलंबित प्रश्न आणि वेतन करार करण्यासाठी अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीचे कामगार बेमुदत संप करणार आहेत. यामुळे कोरोनाच्या काळामध्ये बत्ती गुल(वीज बंद) होणार असल्याची माहिती मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनचे सरचिटणीस विठ्ठलराव गायकवाड यांनी दिली.

अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई कंपनी अस्थापना मधील कामगारांची मान्यता प्राप्त आणि प्रतिनिधिक संघटनेचा दर्जा असलेल्या मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनने रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या सध्याच्या अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई कंपनी व्यवस्थापने समवेत १९ सप्टेंबर २०१६ रोजी वेतन वाढ आणि सोयी सवलतींचा करार केला. या करारान्वये त्यांची पुनर्रचना करण्याचा समझोता केला जाईल. कंत्राटी कामगारांना सेवा ज्येष्ठतेनुसार कायम पदावर घेतले जाईल, कामगारांच्या एका मुलास अथवा मुलीस कंपनीच्या सेवेमध्ये सामावून घेतले जाईल, आर एच आर एस जीआयएस पद्धतीने काम करणारे कामगार आणि माहिती तंत्रज्ञान विभागांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना कायम पदावर सामावून घेतले जाईल, सुधारित पद्धतीचे धोरण अंमलात आणले जाईल, रिक्त असलेली सर्व पदे भरली जातील या सर्व मुद्द्यांची तरतूद करारामध्ये केलेली आहे.

या करारा मधील सर्व प्रलंबित प्रश्न दोन महिन्याच्या आत सोडविण्याचे अदानी इलेक्ट्रिक सिटी कंपनी व्यवस्थापनाने १ सप्टेंबर २०१८ रोजी सोबत लेखी समझोता करून कबूल केले होते. परंतु अंमलबजावणी केली म्हणून कंपनीमधील कामगारांनी नियमाप्रमाणे काम आंदोलन सुरू केले होते. म्हणून अदानी व्यवस्थापनाने मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियन समवेत २० फेब्रुवारी २०१९ रोजी सामंजस्य करार केला. या करारामध्ये २ एप्रिल २०१९ पासून कामगार भरती सुरू करण्यात येईल, सुधारित धोरण अंमलात आणण्याचे आणि रिक्त पदे ३१ मार्च २०२० पर्यंत भरण्यात येतील, समझोता करार व मागणी पत्र वर्षाच्या करून करार करण्याचे ठरले. सामंजस्य कराराची अंमलबजावणी करावी म्हणून आम्ही आदानी व्यवस्थापन, कामगार आयुक्त महाराष्ट्र राज्य, विद्युत नियामक आयोग व महाराष्ट्र शासन यांना अनेकदा अनेक वेळा पत्रव्यवहार केला. परंतु अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई कंपनी व्यवस्थापन चर्चा करून निर्णय घेण्यास अद्याप तयार नाही, असे विठ्ठलराव गायकवाड यांनी सांगितले.

अदानी कंपनी व्यवस्थापनाने प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करावी वीज ग्राहकांना योग्य वीज देयके दिली जावीत, वीज ग्राहकांच्या समस्या दूर कराव्यात या वरील सर्व प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी बेमुदत संप आंदोलन छेडले जावे की जाऊ नये यासाठी कंपनी मधील सर्व कंत्राटी कामगारांचे मतदान येत्या शनिवारी १२ सप्टेंबर रोजी करणार आहेत. बेमुदत संपाच्या बाजूने कामगारांनी बहुसंख्येने मतदान केले तर आंदोलनाची पुढील रुपरेषा जाहीर करून अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई कंपनी व्यवस्थापन कामगार, आयुक्त कार्यालय, कामगार मंत्री, महाराष्ट्र राज्य व विज मंत्री यांना कायदेशीर नोटीस देऊन कामगार बेमुदत संपावर जाणार असल्याचे विठ्ठलराव गायकवाड यांनी सांगितले.