घरमुंबई१ जूनपासून पश्चिम रेल्वेचे वर्कशॉप होणार सुरू

१ जूनपासून पश्चिम रेल्वेचे वर्कशॉप होणार सुरू

Subscribe

३० टक्के कर्मचार्‍यांना उपस्थित राहण्याचे आदेश

अडकलेल्या नागरिकांसाठी रेल्वे मंत्रालयाने १ जूनपासून नियोजित वेळापत्रकानुसार दररोज १०० ट्रेनच्या २०० फेर्‍या सुरु करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर आता पश्चिम रेल्वे मार्गावरील लोअर परेल वर्कशॉपमधील बोगी अंडरफ्रेम, व्हिल शॉप, रोलर बेरिंग आणि महालक्ष्मी वर्कशॉपसुद्धा १ जूनपासून सुरू करण्याची परवानगी मुंबई महानगर पालिकेने दिली आहे. त्यानुसार एकूण कर्मचार्‍यांपैकी ३० टक्के कर्मचार्‍यांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

लॉकडाऊनमुळे देशभरात अडकलेल्या मजुरांसाठी रेल्वे मंत्रालयाने श्रमिक विशेष ट्रेन सोडल्या आहे. यासह आता अडकलेल्या नागरिकांसाठी रेल्वे मंत्रालयाने १ जूनपासून नियोजित वेळापत्रकानुसार दररोज १०० ट्रेनच्या २०० फेर्‍या सुरु करण्याची घोषणा रेल्वेमंत्री यांनी केली होती. त्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या वर्कशॉपमधील कर्मचारी, देखभाल दुरूस्तीचे कर्मचारी, रेल्वे स्टेशनवर काम करणारे कर्मचार्‍यांना कामावर बोलाविण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी कर्मचार्‍यांच्या वाहतुकीसाठी लोकल सेवा सुरु केली होती. मात्र रेल्वे कर्मचारी प्रवास करताना फिजिकल डिस्टंसिंंग पाळले जात नसल्याचे उघड झाले. त्यानंतर मंगळवारी सकाळी कर्मचारी लोकल रद्द करून मेल, एक्सप्रेसचे जनरलचे डबे सोडण्यात आहे. त्यामध्येही कर्मचार्‍यांनी दाटीवाटीने प्रवास केल्याचे उघड झाले आहे.

- Advertisement -

आता पश्चिम रेल्वे मार्गावरील लोअर परेल वर्कशॉपमधील बोगी अंडरफ्रेम, व्हिल शॉप, रोलर बेरिंग आणि महालक्ष्मी वर्कशॉपसुद्धा १ जूनपासून सुरू करण्याची परवानगी मुंबई महापालिकेने दिली आहे. मात्र, काम करत असताना फिजिकल डिस्टिंग वर्कशॉपमध्ये कसे पाळाचे हा मोठा मुदा कर्मचार्‍यांसमोर उभा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -