घरमुंबईजागतिक मानसिक आरोग्य दिन - ५ वर्षात मानसिक रुग्णांत ४८ टक्क्यांनी वाढ

जागतिक मानसिक आरोग्य दिन – ५ वर्षात मानसिक रुग्णांत ४८ टक्क्यांनी वाढ

Subscribe

मुंबईत मानसिक आजारांचं प्रमाण वेगात वाढत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांत अशा आजारामुळे त्रस्त असलेल्या लोकांची संख्या वाढलेली दिसत आहे. दरम्यान, ही एक चांगली बाब असून हल्ली लोकं आपल्या आजाराशी लढण्यासाठी समोर येत आहेत. याआधीही अशा रुग्णांची संख्या वाढती होतीच पण, फक्त काहीच केसेसमध्ये अशी लोकं आणि त्यांचे नातेवाईक पुढे येतात. केईएम हॉस्पिटलमधील असलेल्या एकमेव हेल्पलाईन सेंटरमधून मिळालेल्या आकडेवारीनुसार, मानसिक आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी येणाऱ्या कॉल्समध्ये गेल्या ५ वर्षांमध्ये ४८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

तणाव, नैराश्य आणि आत्महत्या अशा मानसिक आजारांत अडकलेल्यांना फोनच्या माध्यमातून समुपदेशन करण्यासाठी केईएम हॉस्पिटलमध्ये २०१३ मध्ये एक हेल्पलाईन सेंटर सुरू करण्यात आलं होतं. २४ तास सुरू असणाऱ्या या सेंटरमध्ये दररोज १४ कॉल्स येतात. हॉस्पिटलमधून मिळालेल्या माहितीनुसार, २०१३ ते २०१८ पर्यंत २० हजारांहून अधिक कॉल्स आले आहेत. २०१३ मध्ये ३ हजार ७०२ कॉल्स आले होते. २०१८ मध्ये यात ४८ टक्के भर होऊन आता ही संख्या ५ हजार ३५८ पर्यंत पोहोचली आहे.

- Advertisement -

याविषयी अधिक माहिती देताना मानसोपचारतज्ज्ञ विभागाच्या प्रमुख डॉ. अजिता नायक यांनी सांगितलं की, ” सर्वात जास्त घरगुती हिंसेंसंबंधितच कॉल्स येतात. तसंच, गेल्या अनेक वर्षांपासून आत्महत्येचा विचार आलेल्या व्यक्तींच्या कॉल्समध्ये बरीच वाढ झाली आहे. मानसिक समस्यांविषयी वाढलेल्या जनजागृतीमुळे लोक आता याविषयी चर्चा करु लागले आहेत. ”

१० ऑक्टोबर जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून पाळला जातो. आत्महत्येला प्रतिबंध यावर लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे. कारणीभूत ठरणाऱ्या घटकांना रोखून, मानसिक समस्येवर वेळीच उपचार करून आत्महत्येला प्रतिबंध करता येणं शक्य आहे.

- Advertisement -

देशात दरवर्षी दीड लाख आत्महत्या –

आपल्या देशात दरवर्षी सुमारे दीड लाख जण आत्महत्या करत असून ही गंभीर बाब असल्याचे मानसोपचार तज्ज्ञ सांगतात. आत्महत्या रोखल्या जावू शकतात. हा प्रयत्न लोकसंख्या, सामाजिक, भावनिक आणि वैयक्तिक पातळीवरील उपचारांच्या स्वरुपात करणे तातडीची गरज आहे.

निराश व्यक्तीचे समुपदेशन करणे आवश्यक असून किटकनाशके, बंदूक, औषधं अशा अनेक गोष्टींपासून त्यांना दूर ठेवणं गरजेचं आहे, असे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी सांगितले. य्
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार विकसित देशांमध्ये उदासिनता आणि मानसिक विकारातून आत्महत्या होत आहेत. आत्महत्या करण्यापूर्वीचा पहिला प्रयत्न म्हणजे सर्वसामान्यांमधील आत्महत्येचा सर्वात जीवाला धोका पोहचवण्याचा पहिला धोका ओळखला जात आहे. १५ ते २९ वर्षांच्या वयोगटातील मुलांमध्ये आत्महत्या हे दुसरं कारण आहे.

आत्महत्येची कारणे –

  • नात्यांमधील तणाव
  • असह्य वेदना आणि आजारपण
  • सामाजिक संघर्ष, आपत्ती, हिंसाचार, गैरवर्तन
  • व्यवसायातील तोटा अनुभवणे
  • एकाकीपणाची भावना
  • निर्वासित आणि स्थलांतरित असा भेदभावाने असुरक्षिततेची भावना
  • समलिंगी, उभयलिंगी, ट्रान्सजेंडर, इंटरसेक्स (एलजीबीटीआय) व्यक्ती, आणि कैदी
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -