घरमुंबईजागतिक क्षयरोग दिन - 'त्याच्या' टीबीवर औषधांची मात्रा होतेय निकामी

जागतिक क्षयरोग दिन – ‘त्याच्या’ टीबीवर औषधांची मात्रा होतेय निकामी

Subscribe

२०१६ साली कृष्णमुर्तीला टीबीचं निदान झालं. त्यांना 'टोटल ड्रग्स रजिस्टंट' म्हणजेच कोणत्याही प्रकारची औषधं लागू होत नसल्याचं समोर आलं. गेल्या ४ वर्षांपासून कृष्णमुर्ती टीबीने त्रस्त आहेत.

राज्य सरकार आणि महापालिकेकडून क्षयरोगावर मात करण्यासाठी अनेक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. पण, टीबीवरील उपचार महागडे आणि वर्षानुवर्षे चालणार असा समज असल्यामुळे अनेक जण उपचार घेणं ही टाळतात. त्यातून टीबीचा मोठ्या प्रमाणात प्रसार होतो. आजार बराच होणार नाही या भीतीने रुग्ण जगणं सोडतात. असाच काहीसा प्रकार २७ वर्षीय कृष्णमुर्ती (बदललेलं नाव) यांच्यासोबत घडतोय.

काय आहे नेमकं प्रकरण?

२०१६ साली कृष्णमुर्तीला टीबीचं निदान झालं. त्यांना ‘टोटल ड्रग्स रजिस्टंट’ म्हणजेच कोणत्याही प्रकारची औषधं लागू होत नसल्याचं समोर आलं. गेल्या ४ वर्षांपासून कृष्णमुर्ती टीबीने त्रस्त आहेत. त्यांच्यावर काही वर्ष टीबीवरील उपचार ही सुरू होते. पण कालांतराने त्यांच्यावर कोणत्याही औषधांचा परिणाम होत नव्हता. तेव्हा डॉक्टरांनी त्याला टोटल ड्रग रजिस्टंट झाल्याचं समोर आलं. कोणत्याच औषधाचा फरक पडत नव्हता. त्यामुळे त्याने औषधं घेणंच सोडलं. या सर्व त्रासातून त्याने स्वत:ला संपवण्याचा ही प्रयत्न केला. पण, आता गेले दोन वर्ष ते व्हिटॅमिन ‘सी’चं सेवन करत आहेत. व्हिटॅमिन ‘सी’च्या सेवनामुळे आता त्याचं वजन आणि विश्वास ही वाढला असल्याचं शिवडी टीबी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ललित कुमार आनंदें यांनी सांगितलं.

टीबीचं प्रमाण वाढलं असलं तरी अनेक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. पण काही रुग्णांवर औषधांचा फरक नाही. ज्यांना टोटल ड्रग रजिस्टंट झाला असतो. ज्यांना औषधच लागू होत नाहीत. कृष्णमुर्ती हा इंजिनिअर म्हणून काम करत होता. मार्च २०१६ ला त्याला टीबीचं निदान झालं.  पण, त्याच्यावर औषधांची मात्रा लागू होत नाही हे कळलं. त्यामुळे त्याने अनेकदा आत्महत्या करण्याचा देखील प्रयत्न केला. आता गेली काही वर्षे तो व्हिटॅमिन सी घेतोय. नोव्हेंबर २०१८ मध्ये त्याच्या थुंकीची पुन्हा तपासणी केली गेली. तेव्हाही त्याच्या तपासण्या पॉझिटीव्ह निघाल्या. तरीही तो खूश आहे. त्याचा आत्मविश्वास ही वाढला आहे.
– डॉ.‌ ललित कुमार आनंदे, तज्ज्ञ डॉक्टर
- Advertisement -

टीबी रुग्णाला योग्य उपचारांसह अनेकदा त्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी ही मानसिक आधार द्यावा लागतो. त्यामुळे त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन ही बदलण्यास मदत होते.

Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -