घरCORONA UPDATECoronavirus Crisis: मुंबईत कोरोना बाधित रुग्णांमध्ये वरळी परिसर आघाडीवर

Coronavirus Crisis: मुंबईत कोरोना बाधित रुग्णांमध्ये वरळी परिसर आघाडीवर

Subscribe

मुंबईत कोरोनाग्रस्तांची दिवसेंदिवस वाढत असून पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचा वरळी मतदार संघातच सर्वांधिक ५८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. वरळीच्या या ‘जी-दक्षिण’ विभागापाठोपाठ मलबाल हिल, ग्रँटरोड या ‘डि’ विभागात त्याखालोखाल ३१ पॉझिटिव्ह रुग्ण आले आहेत. तर विलेपार्ले ते जोगेश्वरी या पूर्व व पश्चिम या अनुक्रमे २४ आणि २५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. तर मुस्लिम वस्ती असलेल्या डोंगरी, मोहम्मद अली रोड परिसरांत सर्वाधिक कमी म्हणजे २ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेच्या विविध उपाययोजना केल्या जात असून मुंबईतील प्रत्येक भागांमध्ये आता कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून येत आहे. मागील आठवड्यात चेंबूर-देवनार या ‘एम-पूर्व’ विभाग आघाडीवर होता. परंतु या आठवड्यात वरळी, लोअर परळ हा ‘जी-दक्षिण’ विभागात कोरोना रुग्णांचा आकडा वाढलेला आहे. ‘जी-दक्षिण’ विभागातील वरळीत कोळीवाडा, जनता नगर, जिजामाता नगर, पोलिस वसाहत, आदर्श नगर आदी ४ एप्रिलपर्यंत ५८ रुग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे चिंचपोकळी, भायखळा या ‘ई’ विभागात, चेंबूर-देवनार या ‘एम-पश्चिम’ विभागात, गोवंडी-मानखुर्द या ‘एम-पूर्व’विभागासह घाटकोपर ‘एन’ विभाग आदी विभागातील रुग्णांची संख्या नियंत्रणात राखण्यात महापालिकेला यश आले आहे.

- Advertisement -

कांदिवली ‘आर-दक्षिण’ विभाग आणि भांडुप-कांजूर पवई या ‘एस’ विभागात प्रत्येकी ११ रुग्ण, तर गिरगाव चंदनवाडी या ‘सी’ विभाग, गोरेगाव या ‘पी दक्षिण’ विभाग, वांद्रे ते सांताक्रुझ पश्चिम या ‘एच-पश्चिम’, कुलाबा बोरीबंदर या ‘ए’ विभागात प्रत्येकी ७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर दहिसर ‘आर-उत्तर’, बोरीवली ‘आर-मध्य’, माहिम-धारावी या ‘जी-उत्तर’ विभाग व वडाळा-शीव या ‘एफ-दक्षिण’ या विभागांमध्य प्रत्येकी ४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

mumbai coronavirus stats

- Advertisement -

सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून पहिले पाच वॉर्ड

जी-दक्षिण (वरळी,लोअरपरळ) : ५८

डि, (मलबार हिल,ग्रँटरोड) : ३१

के-पूर्व, (विलेपार्ले ते जोगेश्वरी पूर्व) :२४

के-पश्चिम(विलेपार्ले ते जोगेश्वरी पश्चिम) : २५

ई (भायखळा,चिंचपोकळी) : १९

पॉझिटिव्ह रुग्णांची वॉर्डनिहाय संख्या

२० पेक्षा अधिक पॉझिटिव्ह रुग्णांची ठिकाणे : जी-दक्षिण, डि, के-पूर्व, के-पश्चिम

११ ते २० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेली ठिकाणे : ई, पी-उत्तर, एच-पूर्व, एम-पूर्व, एम-पश्चिम,एन, आर-दक्षिण, एस,

१० पर्यंत पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेले वॉर्ड : टी, सी, पी-दक्षिण, एच-पश्चिम, ए, एल, एफ-उत्तर, आर-उत्तर, आर-मध्य, जी-उत्तर, एफ-दक्षिण, बी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -