घरक्रीडानिरुपम यांचा प्रचार महागात; पैलवान नरसिंग यादव पोलीस दलातून निलंबित

निरुपम यांचा प्रचार महागात; पैलवान नरसिंग यादव पोलीस दलातून निलंबित

Subscribe

कुस्तीमध्ये भारतासाठी सुवर्ण कामगिरी करणाऱ्या नरसिंग यादवला संजय निरुपम यांचा प्रचार करणे चांगलेच महागात पडले आहे.

उत्तर पश्चिम मतदार संघाचे काँग्रेस उमेदवार संजय निरुपम यांच्या प्रचार करण्यासाठी आलेल्या पैलवान नरसिंग यादव यांच्याविरोधात काल पोलिसांनी एफआयआर दाखल केला होता. त्यानंतर त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. नरसिंग यादव महाराष्ट्र पोलिसमध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर काम करत होता. मुबंई पोलीस दलामध्ये कार्यरत असताना देखील राजकीय व्यक्तीचा प्रचार केल्यामुळे नरसिंग यादव यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

- Advertisement -

नरसिंग यादवने ऑलिम्पिकमध्ये भारताकडून प्रतिनिधित्व केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आंबोली पोलीस स्टेशनमध्ये नरसिंग यादव याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. नरसिंह यादव याच्याविरोधात आरोप आहे की, रविवारी रात्री पश्चिम मतदार संघाचे काँग्रेस उमेदवार संजय निरुपम यांच्या प्रचारसभेमध्ये सहभागी झाला होता. त्यामुळे आता नरसिंग यादवला पोलिसांची चौकशी आणि कारवाईचा सामना करावा लागणार आहे.

रविवारी रात्री अंधेरी पश्चिम येथील यादवनगरमध्ये संजय निरुपम यांची प्रचारसभा झाली. या प्रचारसभे दरम्यान पोलिसांचे पथक तैनात होते. या सभे दरम्यान, नरसिंग यादव याने संजय निरुपम यांच्या सभा मंचावर उपस्थिती लावली. कायद्यानुसार, कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याला राजकीय पक्षाचा प्रचार करण्याची परवानगी नाही. याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे देखील तक्रार दाखल करण्यात आली आहे.

- Advertisement -

नरसिंग यादव याच्याविरोधात आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आता नरसिंग यादव याचा चौकशीचा सामना करावा लागणार आहे. २०१२ मध्ये नरसिंग यादव याला पोलीस दलात नौकरी देण्यात आली होती. त्याआधी २०१० च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्ण पदक पटकावल्यानंतर त्याला क्लास- १ स्तरावरची नौकरीसाठी पात्र ठरला होता. मात्र तेव्हा तो सेवेमध्ये रुजू झाला नव्हता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -