गेल्या १२१ वर्षांमध्ये २०२० हे वर्ष हे उकाड्याचे वर्ष ठरलेले आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागामार्फत ही माहिती जारी करण्यात आली आहे. गेल्या वर्षी म्हणजे २०२० मध्ये हवेच तापमान हे सरासरीपेक्षा ०.२९ डिग्री सेल्सिअस इतके सरासरीपेक्षा जास्त होते. त्याआधी उकाड्याच्या वर्षाची नोंद ही २०१६ मध्ये सरासरीपेक्षा ०.७१ डिग्री सेल्सिअस अशा तापमानाची नोंद झाली होती. वर्ष २०२० हे उकाड्याच्या वर्षापैकी आठवे असे उकाड्याचे वर्ष आहे. आयएमडीच्या माहितीनुसार १९०१ पासून ते आतापर्यंतच्या वर्षांमध्ये २०२० वर्षाची नोंद आठवे वर्ष म्हणून झाली आहे.
याआधीच्या उकाड्याच्या वर्षांमध्ये २००९ ( सरासरीपेक्षा ०.५५ डिग्री सेल्सिअस अधिक तापमान), २०१५ (०.४२ डिग्री सेल्सिअस) आणि २०१७ (०.५४ डिग्री सेल्सिअस) २०१० (०.५३ डिग्री सेल्सिअस) या वर्षांची नोंद ही गेल्या तीस वर्षांमध्ये झालेली आहे. मॉन्सूनच्या कालावधीत सरासरीपेक्षा असलेले ०.४३ डिग्री सेल्सिअस तापमान आणि मॉन्सूननंतर ०.५३ डिग्री सेल्सिअस अशी तापमानातील वाढ पहायला मिळाली होती. क्लायमेट ऑफ इंडिया २०२० याबाबची माहिती जाहीर करताना आयएमडीने ही माहिती जाहीर केली आहे.
गेल्याच महिन्यात वर्ल्ड मेटेऑरॉजिकल ऑर्गनायजेशन (डब्ल्यूएमओ) मार्फतही जाहीर करण्यात आले होते की, २०२० हे गेल्या १५ वर्षांमधील सर्वात उकाड्याचे असे वर्ष आहे. सरासरीपेक्षा तापमान हे १.२ डिग्री सेल्सिअस अधिक असल्याचेही डब्ल्यूएमओने स्पष्ट केले होते. संपुर्ण दशकच म्हणजे २०११ ते २०२० हे वर्ष उकाड्याचे असे नोंदवण्यात आल्याचेही त्यांनी नमुद केले होते.
जून ते सप्टेंबर २०२० या कालावधीत पाऊसही सरासरीपेक्षा ९ टक्के अधिक होता. पण काही ठिकाणची अतिवृष्टी, पूर, कोल्ड वेव्ह, वादळे यासारख्या परिस्थितीमुळे अनेक भागात व्यक्ती मृत होण्याच्या घटना तसेच थंडीची लाट, वीज कोसळणे अशा घटनातही लोकांचा मृत्यू झालेला आहे. गेल्या एका वर्षात जवळपास ६०० व्यक्ती अशा घटनांमध्ये मृत्यूमुखी पडलेले आहेत. उत्तर प्रदेश आणि बिहार याठिकाणी सर्वाधिक असे थंडीच्या लाटेमुळे, अतिवृष्टीमुळे बळी जाणाऱ्यांची संख्या आहे.
जागतिक पातळीवर अटलांटिक महासागरात ३० हून अधिक चक्रीवादळे निर्माण झाल्याचे पहायला मिळाले आहे. भारतातील अरेबियन महासागर, बंगालची खाडी याठिकाणी पाच चक्रीवादळे तयार झाली. त्यापैकी तीन चक्रीवादळे ही मोठी होती. गेल्या वर्षात एकुण पाच चक्रीवादळे म्हणजे अम्फान, निसर्ग, गाती, निवार आणि बुरेवी अशा चक्रीवादळांची नोंद झाली. त्यापैकी अम्फान हे सर्वात शक्तीशाली असे चक्रीवादळ होते. त्यामुळे बंगालच्या किनाऱ्यावर ९० जण मृत्यूमुखी पडले. तसेच मोठ्या प्रमाणात नुकसानही यामुळे झाले. महाराष्ट्रातही निसर्ग चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची नोंद आहे.