Friday, January 15, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई कॅन्सर, एचआयव्ही रुग्णांना योगा प्रशिक्षण

कॅन्सर, एचआयव्ही रुग्णांना योगा प्रशिक्षण

नायर हॉस्पिटलमध्ये कॅन्सर आणि एचआयव्हीग्रस्तांना योगा प्रशिक्षण दिलं जाणार आहे.

Related Story

- Advertisement -

कॅन्सर, एचआयव्ही या आजारांच्या नावानेही लोकं घाबरतात. हा आजार आपल्याला झाला आहे, या विचारामुळेही अनेक रुग्ण खचून जातात. पण, अशा रुग्णांना जगण्यासाठी सकारात्मकता वाटावी आणि पुन्हा नव्याने जगण्याची उमेद यावी यासाठी पालिकेच्या नायर हॉस्पिटलमधून प्रयत्न केले जात आहेत. लवकरच नायर हॉस्पिटलमध्ये कॅन्सर आणि एचआयव्हीग्रस्तांना योगा प्रशिक्षण दिलं जाणार आहे. याबाबत नायर हॉस्पिटलकडून मुंबई पालिका प्रशासनाला पत्र पाठवलं आहे. पालिकेची परवानगी मिळाल्यानंतर ‘अंबिका योगा इन्स्टिट्युट’ या संस्थेद्वारे नायर रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी येणाऱ्या कॅन्सर रुग्णांना योगाचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे.

मानसिक स्वास्थ्य चांगल ठेवण्यासाठी उपक्रम 

यासंदर्भात नायर हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितलं की, “कॅन्सर आणि एचआयव्ही या आजारावर उपचार केले जातात. पण, सतत गोळ्या, औषधं घेऊन रुग्णांची मानसिक स्थिती ढासळते. त्यामुळे, या रुग्णांची मानसिक स्थिती चांगली करण्यासाठी योगा प्रशिक्षण दिलं जाणार आहे. योगा केल्याने व्यक्ती फक्त शरीरानेच नव्हे तर मानसिकरित्याही फीट राहते. त्यामुळे आम्ही कॅन्सर आणि एचआयव्ही रुग्णांना योगाचं प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच या उपक्रमाला सुरूवात होईल.”

नर्सेसला ‘एचआयव्ही’चं प्रशिक्षण

- Advertisement -

एचआयव्हीबाबत लोकांमध्ये जागरूकता वाढावी, यासाठी ‘मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण सोसायटी’द्वारे काही महिन्यांपूर्वी मुंबईतील पालिकेच्या केईएम, नायर, शीव आणि भगवती हॉस्पिटलमधील परिचारिकांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा भरवण्यात आली होती. आता नायर हॉस्पिटलमधील वरिष्ठ परिचारिकांद्वारे प्रशिक्षित परिचारिकांना एचआयव्हीबाबत प्रशिक्षण दिलं जात आहे. याशिवाय या प्रशिक्षित परिचारिकांना दर शुक्रवारी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत योगाही शिकवला जात आहे. तीन महिन्यांचा हा सर्टिफिकेट कोर्स असल्याचं नायर हॉस्पिटलच्या नर्सेस प्राध्यापक आणि योगा समन्वयक कुंदा राणे यांनी सांगितलं.

- Advertisement -