घरमुंबईपालघरमध्ये रंगणार योगी विरुद्ध उद्धव 'सामना'

पालघरमध्ये रंगणार योगी विरुद्ध उद्धव ‘सामना’

Subscribe

दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर होणाऱ्या पालघर येथील पोट निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून, शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगलाय. एकीकडे शिवसेनेचे मंत्री, आमदार प्रचारासाठी मैदानात उतरले असताना आता भाजपने अजून एक आपला तगडा नेता प्रचाराच्या मैदानात उतरवला आहे. हा नेता दुसरा तिसरा कुणी नसून, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आहेत आणि त्यांना खास भाजपाने पाचारण केले. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आता योगी आदित्यनाथ देखील पालघरच्या मैदानात उतरले आहेत.

उद्धव ठाकरे योगी आमने सामने

- Advertisement -

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे एकाच दिवशी म्हणजे २३ मे, रोजी आमने सामने येणार आहेत. या दोघांची नालासोपाऱ्यात जाहीर सभा होणार आहे. नालासोपारा येथे मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय मतदार आहेत. ही उत्तर भारतीय मते भाजपला मिळावीत यासाठी योगी आदित्यनाथ यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

निवडणुकीसाठी शिवसेनेनेही कसली कंबर

- Advertisement -

एकीकडे भाजपच्या मोठ्या नेत्यांच्या सभा होतायेत तर दुसरीकडे शिवसेनेनेही प्रचारासाठी चांगलीच कंबर कसली असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या पालघरमध्ये दोन जाहीर सभा होणार आहेत. पहिली सभा २३ मे, ला नालासोपारा तर दुसरी सभा २५ मे, ला भोईसरमध्ये होणार आहे. त्यामुळे आधीच रंगत आलेल्या या निवडणुकीमध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होणार हे नक्की.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -