भिवंडीत कावीळच्या आजाराने तरुणीचा मृत्यू

भिवंडी मंगळवारी २० वर्षीय आदिवासी तरुणीचा कावीळच्या आजाराने मृत्यू झाला आहे. या तरुणीच्या मृत्यूमुळे भिवंडी पंचायत समितीच्या आरोग्य विभागाचे पितळ उघडे पडले आहे.

Bhiwandi
young girl death due to jaundice in bhiwandi
भिवंडीत कावीळच्या आजाराने तरुणीचा मृत्यू

मंगळवारी भिवंडी तालुक्यातील जुनांदूर्खी (सातवीपाडा) येथील २० वर्षीय आदिवासी युवतीचा कावीळच्या आजाराने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कविता रघुनाथ सातवी असे कावीळच्या आजाराने मृत झालेल्या युवतीचे नाव आहे. या आदिवासी युवतीच्या मृत्यूने भिवंडी पंचायत समितीच्या आरोग्य विभागाचे पितळ उघडे पडले आहे. सदर युवती वडपे बायपास येथील गोदामात नोकरी करून आपल्या कुटूंबाला हातभार लावत होती.

कविता रघुनाथ सातवी

नक्की काय घडले?

गेल्या पाच दिवसांपासून तिला उलट्या होऊ लागल्याने उपचारासाठी प्रथम तिला खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान तिची प्रकृती चिंताजनक झाल्याने तात्काळ मुंबईच्या जे.जे रुग्णालयात हलवण्यात येऊन उपचार सुरु करण्यात आले होते. मात्र, काल रात्री उपचार सुरु असताना तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

सद्या पावसाळ्याचे दिवस असतानाही भिवंडी पंचायत समितीच्या आरोग्य विभागाकडून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपाय योजना केल्या जात नाहीत. आदिवासी पाड्यांवर असलेल्या पाणवठ्यांचे शुद्धीकरण केले जात नाही. त्यामुळे नागरिकांना मृत्यूला कवटाळावे लागत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामपंचायत सदस्या प्रमिला प्रवीण पाटील यांनी व्यक्त केली आहे.


हेही वाचा प्रविण आष्टीकर यांनी स्विकारला भिवंडी महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार