विक्रोळी येथे डंपरच्या धडकेने तरुणाचा मृत्यू

two youth killed in bike accident at kalyan-karjat highway
accident

विक्रोळी येथे भरवेगात जाणार्‍या डंपरच्या धडकेने एका 22 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला. मुत्थू बालस्वामी तेवर असे या मृत तरुणाचे नाव असून त्याच्या मृत्यूप्रकरणी 29 वर्षांच्या डंपरचालकाला विक्रोळी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. हा अपघात मंगळवारी दुपारी सव्वाबारा वाजता विक्रोळी येथील पूर्व दुतग्रती महामार्गावरील जेव्हीएलआर जंक्शनपासून 80 फूट अंतरावर झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

मुरगन सुडलांयडी तेवर हे मुलुंडच्या जटाशंकर वाडीत राहत असून मृत तरुण मुत्थू हा त्यांचा चुलत मेहुणा आहे. मंगळवारी दुपारी मुत्थू हा त्याच्या अ‍ॅक्टिव्हा बाईकवरुन जात होता. जेव्हीएलआर जंक्शनजवळ ही बाईक येताच भरवेगात जाणार्‍या एका डंपरने धडक दिली होती. त्यात मुत्थू हा गंभीररीत्या जखमी झाला होता. अपघाताची माहिती मिळताच विक्रोळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या मुत्थूला पोलिसांनी जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले.

मात्र डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा उपचार मिळण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. याप्रकरणी मुरगन तेवर यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी डंपरचालकाविरुद्ध हलगर्जीपणाने डंपर चालवून एका तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली.