घरमुंबईक्रिकेट सामन्यादरम्यान हृदयविकाराच्या झटक्यानं खेळाडूचा मृत्यू

क्रिकेट सामन्यादरम्यान हृदयविकाराच्या झटक्यानं खेळाडूचा मृत्यू

Subscribe

क्रिकेट सामन्यादरम्यान हृदयविकाराचा झटका येऊन एका २४ वर्षीय खेळाडूचा मृत्यू झाला आहे. खेळताना किंवा नृत्य करताना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होणारी ही महिन्याभरातील तिसरी घटना आहे.

हृदयविकाराच्या धक्यामुळे चालताफिरता माणूस मृत्यूमुखी पडण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. या घटना आता तरुण वयोगटातील मुलांसोबतही घडत आहेत. गेल्या महिन्याभरात मुंबईमध्ये अशा दोन घटना घडल्या आहेत. आता पुन्हा तशाच एका घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. मुंबईच्या भांडूपमध्ये क्रिकेट सामन्यादरम्यान एका २४ वर्षीय खेळाडूचा मृत्यू झाला आहे. या खेळाडूचे नाव वैभव केसकर असे आहे. क्रिकेट खेळता-खेळता अचानक वैभवच्या छातीत दुखायचला लागलं. त्यामुळे त्याने पंचांना सांगून मैदान सोडलं. छातीत जास्त दुखत असल्यामुळे वैभवचे काही मित्र त्याला जवळच्या रुग्णालयात घेऊन गेले. तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

हेही वाचा – सोमय्या कॉलेजमध्ये रस्सीखेच स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्याचा मृत्यू

- Advertisement -

काय आहे नेमकं प्रकरण?

भांडूपमध्ये सध्या क्रिकेट टूर्नामेंट सुरु आहेत. या टूर्नामेंटमध्ये वैभव हा गावदेवी संघाकडून खेळत होता. या सामन्यात गावदेवी संघाने प्रथम फलंदाजी केली. या फलंदाजीत वैभव तीन षटकं खेळला. त्यानंतर तो क्षेत्ररक्षणाला आला. क्षेत्ररक्षणाला आल्यावर अचानक त्याच्या छातीत दुखायला लागलं. छातीत जास्त दुखायला लागल्यावर त्याने पंचांना सांगून मैदान सोडलं. त्याचे काही मित्र त्याला नजीकच्या भाऊसाहेब रुग्णालयात घेऊन गेले. तिथे उपचारादरम्यान वैभवचा मृत्यू झाला.

महिन्याभरातील तिसरी घटना

मुंबईत या महिन्याभरात अशी तिसरी घटना घडली आहे. याअगोदरही २७ नव्हेंबरला एका कार्यक्रमात एक तरुणी नृत्य करत होती. नृत्य करता-करता अचानक तिला हृदयविकाराचा झटका आला आणि ती मंचावर कोसळली. त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले तेव्हा तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्याचबरोबर १४ डिसेंबरला सोमय्या महाविद्यालयात सुरु असलेल्या रस्सीखेच स्पर्धेत २२ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.

- Advertisement -

हेही वाचा – जादूटोणा आणि करणीमुळे मुलाचा मृत्यू झाल्याच्या संशयावरुन हत्या

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -