घरमुंबईअर्नाळा किनार्‍यावर बुडून तरुण तरुणीचा मृत्यू

अर्नाळा किनार्‍यावर बुडून तरुण तरुणीचा मृत्यू

Subscribe

मध्य प्रदेशातील कुटुंबाच्या हज यात्रेवर विरजण ,एक तरुणी अत्यवस्थ

मध्य प्रदेशातून सहलीसाठी आलेला एक तरुण आणि दोन तरुणी अर्नाळ्यातील समुद्रात बुडाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. या घटनेत एक तरुणीचा मृत्यू झाला, तर दुसरी अत्यवस्थ असून हॉस्पिटलमध्ये आहे. यातील तरुणाचा शोध सुरू होता. सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह सापडला.

मध्य प्रदेश-जबलपूर येथील अन्सारी दाम्पत्य हजसाठी जाणार होते. त्यांना सोडण्यासाठी त्यांची तीन तरुण मुले हिना (26), फरहान (24) आणि अफझल (19) भिवंडीला नातेवाईकांकडे आली होती. हजची तिकिटे 17 जुलैची असल्यामुळे रविवारी 14 जुलैला अन्सारी कुटुंब भिवंडीतील नातलगांसह 15 जण अर्नाळा समुद्र किनारी सहलीसाठी आले होते. सायंकाळी 6 वाजता हिना, फरहान,अफझल पाण्यात उतरले. त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. यावेळी तटरक्षक दल आणि स्थानिक पोलिसांनी फरहान आणि हिनाला बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत हिनाचा मृत्यू झाला होता. तर फरहान बेशुद्ध झाली होती. तिला विरारच्या संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अर्नाळा समुद्रकिनारा अत्यंत धोकादायक आहे. दरवर्षी अनेक जण या किनार्‍यावर बुडून मरण पावतात. पोलीस आणि स्थानिकांच्या सूचनांनाही पर्यटक गांभीर्याने घेत नाहीत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -