परंपरागत मूर्तिकलेसाठी तरुणांचा पुढाकार

Mumbai

गणेशोत्सव जवळ येऊन ठेपल्याने गणेश मूर्तींवर मूर्तिकार अखेरचा हात फिरवित आहेत. शहापूरमधील अनेक मूर्तिशाळांमध्ये या कामाला वेग आला असून तरुण मूर्तिकार कामात मग्न आहेत. आपली परंपरागत मूर्तिकला जपण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेतला आहे. तालुक्यातील कुंभारवाड्यांमध्ये गणेशमूर्तींच्या कामांनी वेग घेतला आहे.

सध्याच्या स्पर्धात्मक व्यवसायात टिकून राहण्यासाठी जे.जे. स्कूल ऑफ आर्ट किंवा विविध प्रकारचे कला क्षेत्रातील पदव्या घेऊन नोकरी व्यवसाय न करता या तरुणांनी परंपरागत कलेला अधिक प्राधान्य दिले आहे. या मूर्तिंना मोठी मागणी आहे.
शहापूर तालुक्यातील शेणवा येथील विशाल कला मंदिरात सखाराम सोनावळे या ज्येष्ठ मूर्तिकारांनी आपल्या अनेक पिढ्यांचा हा कलावारसा जपला आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांंचा मुलगा या व्यवसायात वळला आहे. १० वर्षांचा तरुण कृणाल सोनावळे ही परंपरा आता पुढे चालवण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याने आर्ट टिचर डिप्लोमा पूर्ण केला आहे. तसेच अनेक आकर्षक मूर्ती तो घडवत आहे. विविध प्रकारचे रंग वापरून भाविकांना आवडेल अशी आकर्षक मूर्ती घडवण्याचा प्रयत्न असल्याचे कुणाल सांगतो. गणेशमूर्ती शाळेत अनेक तरुणांना रोजगार मिळाला आहे. यातील काही मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या साकारण्यात आल्या आहेत. रंगरंगोटीचे दर वाढल्याने त्याचा फटका मूर्तीकलेला बसत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here