घरमुंबईअपघातानंतर तरुणाच्या मदतीला धावले स्थानिक, पोलीस हतबल

अपघातानंतर तरुणाच्या मदतीला धावले स्थानिक, पोलीस हतबल

Subscribe

माहिम येथील एल. जे. रोड परिसरा झालेल्या दूचाकी अपघातात तरुणाचा पाय तुटला. या घटनेनंतर रुग्णावाहिका न मागवताच स्थानिकांनीच पोलिसांच्या गाडीतून त्याला रुग्णालयात पोहचवले.

माहिम येथील एल. जे. रोड परिसरात आज सकाळी एका दूचाकीचा अपघात झाला आहे. या अपघातात एक महिला आणि तरुण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर तरुणा पाय तुटला असून महिलेच्या डोक्याला जबर मार बसला. घटनेनंतर या तरुणाला उचलण्यासाठी रुग्णवाहिका न आल्यामुळे येथील स्थानिकांनीच त्याला उचलून पोलिसांच्या गाडीत रुग्णालयात नेले. पाय तुटला असल्यामुळे या तरुणाने तत्काळ उपचाराची मागणी केली मात्र रुग्णावाहिका न आल्यामुळे पोलीस अधिकारीही हतबल असल्याचे चित्र दिसून आले. मुंबईत रुग्णालयाची कमी नाही मात्र अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याचे चित्र या घटनेवरुन दिसून आले. माझ्या आईला फोन करा, मी बरा होईल का, मला रुग्णालयात न्या अशा विनवण्या लोकांना करत असताना व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.

- Advertisement -

कसा घडला अपघात

सकाळी साडे नऊच्या सुमारास सिटीलाईट सिनेमागृहा समोरील मार्गावरून हा तरुणा दूचाकीवरून जात होता. याच रस्त्यावरील सिग्नलच्या दिशेने त्याने भरधाव वेगात दूचाकी पळवली. मात्र याच वेळी रस्ता पार करत असलेली एक महिला त्याच्या समोर आली. दूचाकीवरून नियंत्रण कमावल्यामुळे ही दूचाकी महिलेला धडकली. याच ठिकाणाहून जात असलेल्या गाडी खाली या तरूणाचा पाय आला. यानंतर येथे उपस्थित असलेल्या लोकांना या तरुणाची दूचाकी रस्त्याच्या कडेला लावली. जखमी महिलेला रिक्षाने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र या तरुणाचा पाय तुटल्यामुळे त्याला जागेवरून उभे राहता येत नव्हते. अपघाताच्या वेळेस या ठिकाणी पोलिसांची गाडीही होती. पोलिसांनी घटनेबद्दल नियंत्रण कक्षाला माहिती दिली. मात्र घटनेच्या काही वेळानंतरही रुग्णवाहिनी आली नाही. यानंतर स्थानिकांनीच या तरुणाला उचलून पोलिसांच्या गाडीत रुग्णालयात पोहचवले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -