Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर नवी मुंबई नवी मुंबईत भाजपला अजून एक धक्का; नगरसेविकेसह माजी नगरसेवक राष्ट्रवादीत

नवी मुंबईत भाजपला अजून एक धक्का; नगरसेविकेसह माजी नगरसेवक राष्ट्रवादीत

शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

Related Story

- Advertisement -

नवी मुंबईत भाजपला अजून एक धक्का बसला आहे. भाजपच्या नगरसेविका दिव्या गायकवाड आणि माजी नगरसेवक वैभव गायकवाड यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश झाला. उच्च शिक्षित नगरसेवकाने प्रवेश केल्याने भाजपला फटका बसला आहे. एका आठवड्यात दुसऱ्या प्रवेशाने गणेश नाईकांच्या साम्राज्याला धक्का बसला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जवळ आली असताना भाजपमधून आऊटगोईंग सुरु झाल्याने भाजपच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे.

नवी मुंबईत गणेश नाईक यांची साथ सोडून अन्य पक्षात जाण्याचा सिलसिला कायम सुरू आहे. वाशी नवी मुंबईतील आणखी दोन नगरसेवकांनी भाजपला सोडचिठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला. भाजपच्या वाशी येथील प्रभाग ९४ च्या नगरसेविका दिव्या गायकवाड आणि माजी नगरसेवक वैभव गायकवाड यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी आमदार शशिकांत शिंदे उपस्थित होते. दिव्या गायकवाड आणि वैभव गायकवाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.

- Advertisement -

नवी मुंबईत भाजपत आलेले अनेकजण शिवसेना, राष्ट्रवादीत परतले आहेत. सुरेश कुलकर्णी, संदीप सुतार यांनी भाजपला सोडल्यानंतर डिसेंबर मध्ये नवी मुंबईतील भाजपच्या नगरसेविका अपर्णा गवते आणि दिपा गवते यांनी शिवसेनेत प्रवेश केला. वर्षा निवासस्थानी झालेल्या प्रवेश सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे स्वागत केले. नगरविकासमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते. अपर्णा गवते या स्थायी समिती सभापती नवीन गवते यांच्या पत्नी आहेत. त्यांच्या शिवसेनाप्रवेशामुळे दिघ्यातून भाजपचा सुपडासाफ झाला असून गणेश नाईक यांना जोरदार धक्का बसला आहे. गणेश नाईक यांच्या मनमानी कारभारामुळे नवी मुंबईतील भाजपमधून जोरदार आऊटगोर्इंग सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

- Advertisement -