घरनवी मुंबईभाजपच्या नगरसेवकांवर नवी मुंबई पोलिसांचा दबाव; प्रवीण दरेकरांचा आरोप

भाजपच्या नगरसेवकांवर नवी मुंबई पोलिसांचा दबाव; प्रवीण दरेकरांचा आरोप

Subscribe

नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येत असल्यामुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे. भाजपच्या नगरसेवकांविरोधात पोलीस बळाचा वापर करण्यात येत आहे, असा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. प्रवीण दरेकर यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंग यांची आज नवी मुंबई इथे भेट घेतली. दरेकर यांनी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता पडद्यामागून हे सर्व राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे.

पोलीस बळाचा वापर करुन भाजपच्या नगरसेवकांवर दबाव आणत असल्याचा गंभीर आरोप प्रवीण दरेकर यांनी केला आहे भाजपच्या नगरसेवकांची जुनी प्रकरणे उकरुन काढून त्यांना अडकवण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते सक्रिय झाले आहेत. साम, दाम, दंड आणि भेदाचा वापर केला जात आहे. भाजप नगरसेवकांवर दबाव आणला जात आहे असा आरोप केल्यामुळे नवी मुंबईचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

- Advertisement -

महापालिका निवडणुकीपूर्वीच शहरात फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. साम, दाम, दंड आणि भेदाचा वापर केला जात असल्याचं दरेकर यांनी पोलीस आयुक्तांना सांगितलं. शहरात भयाचं वातावरण आहे. शहरातील वातावरण गढूळ झालं आहे. नगरसेवक आणि नागरिकांमध्ये भय निर्माण होऊ नये ही पोलिसांची जबाबदारी आहे. त्यानुषंगाने पोलिसांनी पावलं उचलवीत, असं सांगतानाच पोलिसांनी दुटप्पी भूमिका घेऊ नये. सरकारच्या दबावाखाली काम करू नये, असं आवाहनही त्यांनी पोलिसांना केलं.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -