Sunday, January 17, 2021
27 C
Mumbai
घर नवी मुंबई नवी मुंबईत राष्ट्रवादीला धक्का; माजी नगरसेवकासह असंख्य पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश 

नवी मुंबईत राष्ट्रवादीला धक्का; माजी नगरसेवकासह असंख्य पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश 

Related Story

- Advertisement -

नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीमध्ये इनकमिंग सुरु असताना आता राष्ट्रवादीमधून ऑऊटगोईंग सुरु झालं आहे. राष्ट्रवादीच्या एका माजी नगरसेवकासह दिघा व कोपरखैरणेतील असंख्य पदाधिकाऱ्यांनी भाजपमधअये प्रवेश केला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये चढाओढ असताना नवी मुंबईत लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी रणशिंग फुंकल्याचे दिसत आहे.

आमदार गणेश नाईक यांनी या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे भाजपमध्ये स्वागत केले. याप्रसंगी माजी आमदार संदीप नाईक, भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी महापौर जयवंत सुतार, माजी महापौर सागर नाईक, भाजपचे मुंबई जिल्हा सचिव विकास झंजाड, माजी नगरसेवक रामआशिष यादव, माजी नगरसेवक अशोक पाटील, माजी नगरसेवक शंकर मोरे, माजी नगरसेवक लक्ष्मीकांत पाटील, माजी नगरसेविका अॅड. भारतीताई पाटील, माजी नगरसेविका शुभांगी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisement -

दिघा विभागात प्रभाग क्रमांक चार मधून माजी नगरसेवक मुकेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली माया गायकवाड, संजय गायकवाड, ध्रुवपद फुलपागर, संजय जावळे, रामप्रवेश यादव, शिरीष गायकवाड यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रभाग क्रमांक पाच मधून भाजपचे दिघा मंडळ अध्यक्ष त्रिभुवन सिंह ठाकुर, युवा नेते दीपक उपाध्याय, युवा अध्यक्ष राम उपाध्याय, दिघा मंडल उपाध्यक्ष वीरू पांडे, समाजसेविका संतोषी उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली इलठण पाडा-कन्हैया नगर परिसरातील शिवसेना व राष्ट्रवादीचे पदाधिकारी ममता गुप्ता, निर्मला पाल, गुलाबी यादव, प्रभादेवी लीला यादव, उषा यादव, सिताराम भारद्वाज, विजय यादव, जुबेर शेख, निलेश उपाध्याय, नरेन्द्र कुमार भोईर, शिवशंकर यादव, अकबर खान, सिराज शेख, कलम पाल, संतोष पाल, नायक मिश्रा, दयाशंकर यादव, संजय यादव, प्रेम सागर यादव, मूलचन्द्र यादव, राम चव्हाण, विनोद सोनी, सुरज गिरी, महेंद्र यादव, बबलू यादव, कैलास गुप्ता, केदारनाथ गुप्ता, रामप्रवेश जाधव, आकाश उपाध्याय, महेंद्र काळे, विजय पाल, दीपक शिंदे, राकेश यादव, संजय गिरी, निर्मला पाल, नितीन गुप्ता, चिंटू पाठक, सुरज गिरी यांनी भाजपात प्रवेश केला.

कोपरखैरणे प्रभाग ४६ परिसरातही शिवसेनेला भगदाड पडले आहे. माजी नगरसेवक शंकर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे प्रभाग क्रमांक ४६ चे शाखाप्रमुख किशोर मोरे यांच्यासमवेत संजय चव्हाण यांच्यासह अनेक कार्यकर्ते यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

महापालिकेवर भाजपचाच झेंडा फडकेल – नाईक

- Advertisement -

गुंडशाही आणि बळाचा वापर करून भाजपच्या कार्यकर्त्यांना धमकावून त्रास देण्याचे प्रकार विरोधकांकडून सुरू झाले आहेत. त्यावर चिंता करू नका, असा दिलासा देत आमदार गणेश नाईक यांनी आपण कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा संदेष यावेळी मार्गदर्शन करताना कार्यकर्त्यांना दिला. सुजाण जनता अपप्रवृत्तींचा निश्चितच विनाश करणार आहे.  समाज चांगल्या गोष्टीची किंमत करणारा आहे असे नमूद करून नवी मुंबई महापालिकेवर भाजपचाच झेंडा फडकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई भाजप लोकाभिमुख आहे. नवी मुंबईत भाजपचाच जोर असून कार्यकर्ते नाईक यांच्या विचारांनी प्रेरित आहेत. नवी मुंबई पालिकेवर भाजपची सत्ता पुन्हा स्थापन होईल.

– रामचंद्र घरत, जिल्हाध्यक्ष भाजप

 

- Advertisement -