आजचा रंग जांभळा : पाहा काय आहे जांभळ्या रंगाचं महत्त्व!

Mumbai
Color Purple
आजचा रंग जांभळा

नवरात्रौत्सवातील आज आठवी माळ आणि नवरात्रीतील आजचा रंग जांभळा. या दिवशी महागौरी देवीची पूजा केली जाते. तसेच देवीला तांबडी फुले, कमळ जास्वंद, कण्हेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ घातली जाते. हा दिवस दुर्गाष्टमी म्हणून देखील ओळखला जातो. दुर्गादेवीचा रौद्र अवतार असलेल्या देवीची पुजा केली जाते. या दिवसाचे नवरात्रौत्सवाच विशेष महत्त्व आहे.